Saturday, June 29, 2024

‘स्वतःमध्ये तो बदल आणा…’, PMO ऑफिसला टॅग करत बॉलिवूडची मस्तानी दीपिकाने सांगितली मन की बात

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण सध्याच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते. सौंदर्य, अभिनय आणि नृत्य या तिघांचा सुंदर मिलाप असणारी दीपिका लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच पसंतीची आहे. नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी दीपिका सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती नेहमीच चालू घडामोडी आणि सामाजिक गोष्टींवर स्वतःचे मत या माध्यमातून व्यक्त करत असते. नुकतेच दीपिकाने एक ट्वीट केले असून, हे ट्वीट सध्या खूप व्हायरल होत आहे.

दीपिकाचे हे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमासंबंधित आहे. या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान कार्यालयाला देखील टॅग केले आहे. मोदी यांचा नुकत्याच झालेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमानंतर तिने हे ट्वीट करून तिचे मत मांडले आहे.

पंतप्रधानांनी त्यांच्या मन की बातमध्ये देशाला संबोधित करताना स्त्रीशक्तीचा उच्चार केला. पीएमओ कार्यालयाने देखील मन की बातचे काही मुद्दे ग्राफिक्सच्या माध्यमातून ट्विटरवर पोस्ट केले आहेत. दीपिकाने याच ट्विटला रिट्विट करताना महात्मा गांधी यांची एक शिकवण सांगितली आहे.

दीपिकाने तिच्या ट्विटमध्ये महात्मा गांधीजींचे एक वाक्य लिहिले, “स्वतःमध्ये तो बदल आणा जो तुम्ही जगामध्ये बघू इच्छिता.” पुढे तिने लिहिले की, “हे शब्द स्त्रियांना आणि जगातल्या सर्व स्त्रियांसाठी पुरेसे नाहीये.” हे ट्वीट तिने पीएमओ कार्यालयाला देखील टॅग करत #NariShakti आणि #MannKiBaat हे हॅशटॅग वापरले आहेत. दीपिकाचे हे ट्वीट जबरदस्त व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे, तर काहींनी तिला पाठिंबासुद्धा दिला आहे.

दीपिका बऱ्याचदा सामाजिक मुद्यांवर तिचे मत निडर होऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असते. मात्र, ती राजकारणावर नेहमीच शांत असते. पण जेव्हा ती तिच्या ‘छपाक’ चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी JNU मध्ये आंदोलन करणाऱ्यांमध्ये पोहचली होती, तेव्हा तिच्या न बोलण्याने देखील ती खूप काही बोलून गेली.

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर ती सध्या पाठच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सोबतच ती लवकरच ऋतिक रोशनच्या फायटरमध्ये देखील दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

दीपिका पदुकोण आणि ड्रुग्सचा सिलसिला काही संपेना!

हैप्पी बर्थडे मस्तानी: जाणून घेऊया मॉडेलिंग ते सुपरहिट अभिनेत्री होण्याचा दीपिकाचा प्रवास

‘त्याने’ एकदा नाही तर दोनदा माझा विश्वासघात केला… दीपिकाने लावले ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्यावर आरोप!

 

हे देखील वाचा