रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या अफेअर आणि रोमान्सबाबत काळी इंडस्ट्रीमध्ये जोरदार चर्चा चालू होत्या. त्यांना अनेकवेळा एकत्र पाहिले गेले आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच त्यांची ऑनस्क्रिन जोडी देखील सगळ्यांना आवडत होती. चित्रपटात काम करताना त्यांची केमेस्ट्री आणि रोमान्स सगळ्यांना खूप आवडायची. म्हणूनच प्रेक्षकांची आवडती जोडी ठरली होती. माध्यमातील वृत्तानुसार, ‘बचना ए हसीनो’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांची जवळीक वाढली होती. त्याच्या चाहत्यांसोबत त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना देखील असे वाटायचे की, ते दोघे लवकरच लग्न करून सेटल होतील. परंतु या सगळ्यात सगळ्यांना हैराण करणारी दीपिका आणि रणबीरची ब्रेकअपची बातमी समोर आली.
माध्यमातील वृत्तानुसार, दीपिका पदुकोणसोबत सिरियस रिलेशनमध्ये असताना देखील रणबीर तिला चिट करत होता. असे म्हणतात की, दीपिकाने स्वतः रणबीरला एका दुसऱ्या अभिनेत्रीसोबत रंगे हात पकडले होते. त्यांच्या रिलेशनमध्ये असणाऱ्या या गोष्टींमुळे दीपिका आणि रणबीरचे ब्रेकअप झाले होते.
हाती आलेल्या माहितीनुसार, रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका डिप्रेशनमध्ये गेली होती. अभिनेत्रीने अनेकवेळा या गोष्टीचा उल्लेख केला आहे. तिने सांगितल्यानुसार, तो काळ दीपिकाच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट काळ होता. या डिप्रेशनमधून तिला बाहेर काढण्यासाठी खुद्द रणबीर कपूरने तिला मदत केली होती. दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचे नाते संपल्यानंतर देखील रणबीर कपूरने एक मित्र बनून तिला या डिप्रेशनमधून बाहेर काढण्यास मदत केली होती.
त्यांचे हे नाते संपल्यानंतर रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण रिलेशनमध्ये आले. त्यानंतर त्या दोघांनी सगळ्यांच्या साक्षीने सात फेरे घेऊन एकमेकांना आयुष्याचे साथीदार बनवले. त्यांच्यातील प्रेम आणि केमेस्ट्री तर संपूर्ण इंडस्ट्रीला माहित आहे. रणवीर दीपिकावर जेवढे प्रेम करतो तेवढाच तो तिचा आदर देखील देखील करतो. एका अवॉर्ड शोमध्ये त्याने सांगितले होते की, दीपिका त्याच्या घरची लक्ष्मी आहे. यातूनच त्यांच्या सुखी संसाराची माहिती होते. तसेच रणबीर कपूर सध्या आलिया भट्टसोबत रिलेशन मध्ये आहे आणि लवकरच ते दोघे लग्न करणार आहेत.
त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, दीपिका पदुकोणचा ‘गेहराईया’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील इंटीमेट सीन्समुळे ती खूप चर्चेत आहे. तसेच ती ‘पठाण’ आणि ‘फायटर’ या दोन आगामी चित्रपटात दिसणार आहे.
हेही वाचा :