बॉलिवूडमध्ये अनेकदा पैशावरून कलाकार आणि दिग्दर्शक, निर्माते यांच्यात कधी कधी काही समीकरणं जुळत नाही. त्यामुळे बरेच हिट सिनेमे दिलेल्या दिग्दर्शक आणि कलाकारांच्या जोड्या या कारणावरून वेगळ्या होताना आपण पहिल्या आहेत. वेगळे होणे म्हणजेच त्यांच्यात वाद होणे असे नाही. व्यवहारावरून गणितं न जुळल्याने कलाकार आणि दिग्दर्शक आपसी सहमतीने देखील एखाद्या प्रोजेक्टमध्ये सोबत दिसत नाही.
सध्या असेच काहीसे ऐकू येत आहे ते बॉलिवूडचे आघाडीचे दिग्दर्शक असणारे संजय लीला भन्साळी आणि टॉपची अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्याबद्दल. भन्साळी आणि दीपिका हे ‘बैजू बावरा’ चित्रपटाच्या निमित्ताने बरेच चर्चेत आले होते. ही हिट जोडी ‘बैजू बावरा’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा मोठा पडदा गाजवणार असेच सर्वांना वाटत होते.
सुरुवातील यात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असे सांगितले जात होते. मात्र नंतर रणवीर सिंग ही भूमिका साकारणार हे पक्के झाले असल्याचे सांगितले जात आहे. मुख्य नायक रणवीर सिंग ठरल्यानंतर मुख्य अभिनेत्री म्हणून दीपिकाच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. पण आता येणाऱ्या माहितीनुसार दीपिका या चित्रपटाचा भाग नसणार असल्याचे सांगितले जात आहे.
एका मोठ्या पोर्टलच्या बातमीनुसार, दीपिकाने या सिनेमासाठी बक्कळ रक्कम मागितली असल्याचे सांगितले जात आहे. असे सांगितले जात आहे की, या चित्रपटासाठी दीपिकाने रणवीर सिंग एवढ्याच फीची मागणी केली आहे. आज दीपिका हिंदी चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. दीपिका म्हणजे ‘हिट’ची ग्यारंटी झाली आहे. त्यामुळे तिला सिनेमात घेण्यासाठी ती मागेल तितकी फी तिला दिली जाते. मात्र या सिनेमासाठी अशी कोणतीही शक्यता घडून येणार नसल्याचे लक्षात येत आहे. आतापर्यंत दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि संजय लीला भन्साळी यांनी ‘राम लीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ हे तीन ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. त्यामुळे हे त्रिकुट मोठा धमाका करणार हे वाटत असताना, मधेच माशी शिंकली आहे.
रणवीर आणि दीपिका लवकरच कबीर खानच्या ‘८३’ सिनेमात सोबत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी
-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…