दीपिका सिंग (Deepika Singh) ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे, जी आता बॉलिवूडमध्ये थैमान घालण्यासाठी सज्ज झाली आहे. दीपिकाच्या पदार्पण चित्रपटाचे नाव ‘टीटू अंबानी’ आहे, ज्यामध्ये ती मॉडर्न मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्री खूप उत्सुक आहे आणि आता या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीझ झाला आहे, जो खूपच मजेदार आहे. या चित्रपटात दीपिका ‘मौसमी’ नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे, जिला स्वतःच्या अटींवर जगणे आवडते. तसेच ‘आश्रम’ या वेब सीरिजमध्ये दिसलेला अभिनेता तुषार पांडे (Tushar Panday) यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
चित्रपटाची कथा एका मध्यमवर्गीय कुटुंबाची आहे, ज्यामध्ये एकुलती एक मुलगी तिचे संपूर्ण घर चालवते. पण तिच्या आई-वडिलांना मुलीने लग्न करावे असे वाटते. ट्रेलरची सुरुवात देखील मौसमीच्या (दीपिका सिंग) लग्नापासून होते, जिथे तिचे पालक तिला एका मुलाचा फोटो दाखवतात. परंतु मौसमीला टिटूसोबत (तुषार पांडे) लग्न करायचे आहे, कारण दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत. मात्र लग्नानंतर दोघांच्याही आयुष्यात मोठे बदल घडतात. (deepika singh movie titu ambani trailer release)