Monday, July 1, 2024

फक्त शर्ट घालून अभिनेत्री दीपिका सिंगने केले सिझलिंग फोटोशूट, पाहून तुमचंही हरपेल भान

‘दिया और बाती हम’ फेम अभिनेत्री दीपिका सिंग ही संध्या या नावाने घराघरात पोहोचली आहे. या मालिकेनंतर दीपिका टेलिव्हिजनवर दिसली नाही. पण सोशल मीडियावर मात्र तिचा वावर मोठ्या प्रमाणत आहे. ‘दिया और बाती हम’ या मालिकेत कधी साडीत, तर कधी पोलिसांच्या वर्दीमध्ये दिसणाऱ्या दीपिकाचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांसमोर आला आहे. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये तिने केवळ शर्ट परिधान केलेला दिसत आहे.

दीपिका सिंगने एक बोल्ड सिझलिंग फोटोशूट केले आहे. दीपिकाला पहिल्याच वेळेस या अशा लूकमध्ये पाहून तिचे चाहते हैराण झाले आहेत. तिने हे फोटोशूट एका मॅगझिनसाठी केले आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती केवळ शर्ट घालून खुर्चीवर बसलेली आहे. तिने बोल्ड पोझ दिल्या आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “धन्यवाद.”

दीपिकाने डाऊनटाऊन मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी हे फोटोशूट केले आहे. तिचा हा बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. सगळेजण तिला या फोटोवर कमेंट करून तिच्या वेगळ्या लूकचे कौतुक करत आहे. तसेच तिचा हा फोटो वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

दीपिका सिंग ही मागील काही दिवसात तिच्या एका फोटोमुळे खूप ट्रोल झाली होती. तौक्ते चक्रीवादळात पडलेल्या झाडासोबत तिने फोटो काढले होते. तसेच पावसात भिजत तिने या झाडासोबत डान्स देखील केला होता. हे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले होते की, “तुम्ही या वादळाला थांबवू शकत नाही, त्यामुळे हे असे करण्याचा प्रयत्न देखील करू नका. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःला शांत ठेवू शकता. निसर्गाच्या या उदास आणि नाराज अंदाजाला मिठी मारू शकता. हे वादळ लवकरच निघून जाईल. हे झाड माझ्या घरासमोर पडले आहे. पण त्यामुळे कोणाला काही इजा झालेली नाहीये. परंतु या झाडाला बाजूला करण्याआधी मी आणि रोहितने या झाडासोबत फोटो काढून काही आठवणी तयार केल्या आहेत.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीच्या जबरदस्त व्हिडिओवरून हटेना चाहत्यांची नजर; पाहा तिची मोहक अदा

-‘ओव्हर ऍक्टिंगचे दुकान’, ‘खड तैनू मैं दस्सा’ गाण्यावरील नेहा कक्करचे एक्सप्रेशन्स पाहून युजरची कमेंट

-तूफानों से’ गाणं म्हणत कैलाश खेर, शिबानी कश्यप अन् सुदेश भोसले यांनी केला कोरोना योद्धांना सलाम

-‘मास्क लावायचे ज्ञान देत होती, आता..’, हर्षाली मल्होत्राचे बीचवरील फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

हे देखील वाचा