Wednesday, July 3, 2024

‘ओम शांती ओम’ला १४ वर्षे पूर्ण; ‘या’ कारणामुळे दीपिकावर होतोय कौतुकाचा वर्षाव

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही आज एक नावाजलेली अभिनेत्री आहे. अनेक चित्रपटात तिने महत्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत. आज जरी तिने कितीही चित्रपटात काम केले असले, तरीही तिचा पहिला चित्रपट कोणीही विसरू शकत नाही. दीपिका पदुकोणला इंडस्ट्रीमध्ये येऊन १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. तिने ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात शाहरुख खानसोबत पदार्पण केले होते.

फराह खानने दिग्दर्शन केलेला ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट ९ नोव्हेंबर २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दीपिका आणि शाहरुखसोबत अर्जुन रामपाल, श्रेयस तळपदे आणि किरण खेर महत्वाच्या भूमिकेत होते. दीपिकाचा पहिलाच चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यामुळे तिचा हा पहिलाच चित्रपट तिच्यासाठी खूप खास आहे. इंडस्ट्रीमध्ये येऊन १४ वर्ष पूर्ण झाल्याने सोशल मीडियावर सगळे तिला शुभेच्छा देत आहेत. (Deepuka padukone trending on social media for 14 years of film om shanti om)

पूर्व जन्मावर आधारित असणाऱ्या या चित्रपटात फराह खानने दीपिकाला एका वेगळ्या रूपात समोर आणले होते. तिच्या चाहत्यांनी तिच्या पहिल्याच चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला होता. तिचे चाहते सोशल मीडियावर #14yearsofdeepikaPadukone या नावाने ट्वीट करत आहेत. अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट करून तिला शुभेच्छा देत आहेत. दीपिका पदुकोणच्या एका चाहत्याने ट्वीट केले आहे की, “१४ वर्षाचा चित्रपट सृष्टीतील प्रवसाच्या खूप शुभेच्छा.” आणखी एका चाहत्याने लिहिले आहे की, “२३ बॉलिवूड चित्रपट २५ अविस्मरणीय पात्र, २०१४ पासून एक अभिनेत्री, सर्वात जास्त फी घेणारी अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, खूप अवॉर्ड्स, एक स्त्री, दीपिका पदुकोण.”

दीपिका पदुकोण ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात रेट्रो लूकमध्ये दिसली होती. चित्रपटातील प्रेम कहाणी, गाणी डायलॉग खूप प्रसिद्ध झाले होते. शाहरुख खानचा अभिनय नावाजण्याजोगा होता. तसेच ‘मैं अगर कहूॅं’, ‘जग सूना सूना लागे’ यांसारखी गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटात दीपिका पदुकोणचा डबल रोल दाखवला होता. या एकाच चित्रपटाने तिला यशाच्या शिखरावर पोहचवले होते. त्यानंतर तिला एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट मिळाले. आज ती इंडस्ट्रीमधील एक डिमांडेड अभिनेत्री आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुखरूप परत ये, लग्न करायचंय’, बेअर ग्रिल्ससोबत ॲडव्हेंचरला निघालेल्या विकी कौशलच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

हे देखील वाचा