Wednesday, July 3, 2024

कंटेस्टंटचा परफॉर्मन्स पाहून दलेर मेहंदी रडले ढसाढसा; भाऊ मिका सिंगने मारली मिठी; पाहून तुमचेही डोळे पाणावतील

डान्सिंग रियॅलिटी शो ‘डान्स दीवाने’ नेहमीच प्रेक्षकांचा आवडता शो राहिला आहे. हा कार्यक्रम सर्व वयोगटातील व्यक्तींना आपली कला दाखवण्याची संधी देतो. अनिल कपूरपासून ते जॅकी श्रॉफपर्यंत आतापर्यंत अनेक स्टार्स पाहुणे म्हणून या शोमध्ये आल्याचे आपण पाहिले आहे. त्यांनी आपल्या मजेदार नृत्याने शोमध्ये अनेकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत. या आठवड्यात शोमध्ये खास पाहुण्यांचे आगमण होणार आहे. मिका सिंग आणि दलेर मेहंदी हे  आठवड्याच्या शेवटी शोमध्ये हजेरी लावतील.

परफॉर्मन्स पाहून दलेर मेहंदी झाले भावनिक
पंजाबी बांधवांची जोडी ‘डान्स दीवाने ३’च्या मंचावरील प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवत आहे. या शोचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये बरीच गंमतीशीर झलक दिसत आहे. या शोच्या प्रोमोमध्ये, एका स्पर्धकाचा परफॉर्मन्स पाहून दलेर मेहंदी भावनिक होतात आणि त्यांचा भाऊ मिका सिंग त्यांना मोठ्या आपुलकीने मिठी मारतो, हे दिसत आहे.

मिका सिंगने त्या क्षणी दलेर मेहंदींना मारली मिठी
एका स्पर्धकाच्या परफॉर्मन्स दरम्यान, दलेर मेहंदी इतके भावुक होतात की, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. भावाच्या डोळ्यातील अश्रू पाहून मिका सिंग लगेच त्याच्या खुर्चीवरून उभा राहतो आणि दलेर मेहंदींना मिठी मारतो. हा प्रोमो रिलीज करताना चॅनलने लिहिले आहे की, ‘दलेर मेहंदी आणि मिका सिंग यांच्यासोबत काही आनंदी, भावनिक आणि मजेदार क्षण. आपण आपल्या बालपणीच्या आठवणीला पुन्हा देऊ उजाळा.”

या क्षणी बालपण पुन्हा आठवले
या आठवड्यातील प्रोमोमध्ये बालपण पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले आहे. मुलाची कामगिरी पाहून दलेर मेहंदींच्या डोळ्यात अश्रू येतात. जर या कामगिरीमध्ये एखादा मुलगा त्याच्या मित्रापासून विभक्त झाला, तर त्याचे काय होईल? हे पाहून, दलेर मेहंदी स्वतःला थांबवू शकत नाही आणि त्यांना रडू कोसळते.

मुलाची कामगिरी पाहून दलेर मेहंदीसह सेटवर उपस्थित असलेल्या प्रत्येकच्या डोळ्यात अश्रू  येतात, तर काही स्पर्धकांची कामगिरी पाहून मिका सिंग आणि दलेर मेहंदी यांना त्यांचे हसू आवरता येत नाही. ज्याप्रकारे स्पर्धकांनी मिका सिंग आणि त्याच्या भावाचे मनोरंजन केले. त्यांनी सर्वांना त्यांच्या सुरांवर नाचायला लावले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण

-कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा

-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल

 

हे देखील वाचा