Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

एक चुक पडू शकते महागात! सलमानच्या ‘राधे’ सिनेमामुळे तुमचं वॉट्सॲप होऊ शकत कायमच बॅन

सलमान खानचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिनेमा ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा १३ मे रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला. कोरोनाच्या महामारीमुळे बंद असलेल्या चित्रपटगृहांमुळे सलमान खानने त्याचा ‘राधे’ सिनेमा यावर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला आहे. तर भारताबाहेर काही ठिकाणी चित्रपटगृहांमहे हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.

मात्र चित्रपट प्रदर्शित होताच पायरसीला बळी ठरला. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अगदी काही तासातच हा सिनेमा ऑनलाइन लीक झाला आणि त्याची पायरेटेड कॉपी सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे सलमान खानच्या मॅनेजरने मुंबईच्या सायबर सेलमध्ये या पायरसीविरोधात लेखी तक्रार नोंदवली. सोबतच झी इंटरटेन्मेन्टने देखील दिल्लीमध्ये या पायरसीविरोधात तक्रार नोंदवली होती.

यावर आता हायकोर्टाने एक कडक आदेश जरी केला आहे. दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीश संजीव नरुला यांनी यावरील सुनवाई दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाच्या बेकायदेशीररित्या प्रसारित करण्यावर बंदी घातली आहे. सोबतच ज्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकांवरून या चित्रपटाच्या पायरसी कॉपी विकल्या जात होत्या, अशा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकांना बंदी घालण्याचे आदेश सुद्धा कोर्टाने दिले आहेत.

एअरटेल, जिओ, वोडाफोन आदी अनेक देशातील सर्व प्रमुख टेलिकॉम ऑटरेटर्सलादेखील पायरसी करणा-या ग्राहकांची माहिती देण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. यामुळे झी5 अशा ग्राहकांविरूद्ध कायदेशीर कारवाई करू शकेल.

या पायरसीबद्दल समजताच सलमान खानने देखील सोशल मीडियावर लोकांना चाहत्यांना पायरसीपासून दूर राहण्याचे आवाहन केले होते. सोबतच त्याने लिहिले होते की, ” आम्ही तुम्हाला २४९ रुपये प्रति व्यु रुपयांच्या रास्त दरात हा सिनेमा अगदी घरबसल्या पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला. मात्र असे असूनही अनेक लोक बेकायदेशीर पद्धतीने हा सिनेमा स्ट्रीमिंग करत आहे. असे करणे हा गंभीर गुन्हा असून, तुम्ही सायबर सेलच्या कचाट्यात अडकण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे असे काही करू नका.”

काही दिवसांपूर्वी अश्विनी राघव नावाच्या एका फेसबुक युजरने ‘राधे’ हा चित्रपट व्हॉट्सअ‍ॅपवर ५० रुपयांना विकत असल्याचे पोस्ट केले होते. प्राप्त माहितीनुसार झी वितरण पथकाने त्याच्याकडे चित्रपटाची मागणी केली असता त्याने ५० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. या प्रकरणी अश्विनीसह आणखी दोन जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला होता.

सलमानच्या ‘राधे’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ओटीटीवर 100 कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केला आहे.

हे देखील वाचा