कंगनावर दिल्ली शीख गुरूद्वार प्रबंधन समितीची नाराजी, पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची केली मागणी


बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही सध्या जोरदार चर्चेत आहे. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर तिने स्वातंत्र्याबाबत जे काही वक्तव्य केले होते, त्यानंतर तिच्यावर समाजातील सगळ्या स्तरातून जोरदार टीका झाल्या आहेत. अशातच दिल्ली शीख गुरूद्वार प्रबंधन समितीने रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून, अभिनेत्री कंगना रणौत हिचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्याचा आग्रह केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कंगना सांप्रदायिक क्षेत्रात राग पसरवण्यासोबतच धार्मिक समुदायाच्या निशाण्यावर येत आहे. तसेच शेतकरी आणि स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करत आहे.

सोशल मीडियावर देशद्रोही आणि अपमानकारक टिपण्णी केल्याप्रकरणी शीख संघटनेने शनिवारी कंगना विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रपती यांना लिहिलेल्या पत्रात डीएसजीएमसी म्हणजेच शिरोमनी अकाली दलाचे मनजिंदर सिरसा यांनी सांगितले की, कंगना १९८४ मधील शीख विरोधात झालेल्या दंगलीचा मुद्दाम उल्लेख करून त्यांना उकसवत आहे. (demands kangana Ranaut to take back Padma Shri award)

पद्मश्री पुरस्कार परत देण्याबद्दल सिरसा यांनी सांगितले की, “ती या सन्मानाला पात्र नाही. ती भारताच्या या मूळ भावनेचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. या गोष्टी लोकांच्या चांगुलपणावर आधारित आहेत. सामाजिक भान राखून काही शेतकरी, शीख आणि स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केल्याबद्दल कंगनाकडून पद्मश्री पुरस्कार लगेच परत घेतला पाहिजे.” तसेच त्यांनी सांगितले की, डीएसजीएमसीचे एक प्रतिनिधीमंडळ या प्रकरणावरून सोमवारी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे यांना भेटायला आणि कंगना रणौत विरोधात तक्रार करण्यासाठी मुंबईला जाणार आहेत.

कंगना रणौतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच तिच्या ‘धाकड’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती अर्जुन राजपालसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सोबतच ती ‘थलायवी’ आणि ‘तेजस’, मणीकर्णिका रिटर्न्स : द लेजेंड ऑफ जिद्दा’, ‘टिकू वेड्स शिरू’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. ती एक अभिनेत्रीसोबत निर्माती देखील आहे. तिने तिच्या प्रोडक्शनच्या बॅनरखाली ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. साई कबीर हा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रभास अन् पुजा हेगडेचा ‘राधे श्याम’ रिलीझपूर्वीच लीक! ‘अशी’ काहीशी आहे चित्रपटाची कथा

-दहावीत असताना होती पहिली गर्लफ्रेंड, चित्रपटांप्रमाणेच रंगतदार होती कार्तिक आर्यनची लव्हलाईफ

-अरे वा! अखेर ‘देवमाणूस’चा पुढचा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल


Latest Post

error: Content is protected !!