Saturday, June 29, 2024

‘यूटी 69’चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी; राज कुंद्रा म्हणाला, ‘दगड फेकणे सोपे आहे पण…’

उद्योगपती आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा लवकरच अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तो चांगलाच चर्चेत आला आहे. त्याचा ‘यूटी 69’ हा चित्रपट येत्या 3 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सध्या तो या चित्रपटामुळे चर्चेत आहे. राजच्या तुरुंगात घालवलेल्या दिवसांची कथा चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. राजही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे.मात्र, या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.

या मागणीचे कारण म्हणजे राज कुंद्रा (Raj Kundra) याचा तुरुंगात घालवलेला काळ. 2021 मध्ये राज कुंद्रावर अश्लील चित्रपट प्रसारित केल्याचा आरोप झाला होता आणि त्याला 2023 पर्यंत तुरुंगात ठेवण्यात आले होते. या प्रकरणात राज कुंद्राला दोषी ठरवण्यात आले होते आणि त्याला तीन वर्षांची शिक्षा झाली होती. सोशल मीडियावरील काही वापरकर्त्यांच्या मते, राज कुंद्राने केलेले कृत्य समाजासाठी धोकादायक आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकून त्याला शिक्षा दिली जावी, अशी त्यांची मागणी आहे.

राज कुंद्रा या चित्रपटाचा प्रमोशन जोरदार करत आहे. त्याने या चित्रपटातून आपली निर्दोषता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्याच्या चित्रपटावर बहिष्काराची मागणी वाढत असल्याने त्याच्या चित्रपटाच्या यशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका युजरने ट्विट करून राजच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. युजरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे – “हा व्यक्ती ज्या प्रकारे महिलांचा अपमान करतो. त्याच्या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे. त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाका.”

या ट्विटला राजने उत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले – “कृपया तुमच्या दाव्याचे समर्थन करणाऱ्या एका महिलेचेही नाव सांगा. दगडफेक करणे सोपे आहे. पण कृपया पुराव्यासह विधान करा. देव तुम्हाला आनंदी ठेवो. केवळ मीडियामुळे द्वेष निर्माण झाला आहे.” या चित्रपटात राज स्वत: त्याची भूमिका साकारत आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, तर राज कुंद्राचा चित्रपट यूटी 69 3 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. (Demand for ban on industrialist and Shilpa Shetty husband Raj Kundra film UT 69)

आधिक वाचा-
ऐश्वर्यासोबत इंटिमेट सीन करताना थरथर कापत होता रणबीर कपूर; पुढे…
‘समोरचा कितीही माजलेला असला तरी…’ प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट व्हायरल; म्हणाला, ‘कुणाचा बाप…’

हे देखील वाचा