Wednesday, July 3, 2024

एवढे मोठे सुपरस्टार असून का झाले कमल हसन प्रेमाच्या बाबतीत अपयशी?

कमल हसन भारतीय चित्रपटसृष्टीतील एका प्रसिद्ध, जेष्ठ, लोकप्रिय अभिनेता. कमल हसन हे त्यांच्या अभिनयासोबतच खाजगी आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या आयुष्यात एका नाही तर ५ महिला आल्या मात्र कोणत्याच स्त्रीसोबत कमल हसन यांचे नाते यशस्वी होऊ शकले नाही. आज वयाच्या ६६ व्या वर्षी देखील कमल हसन एकटे आहे.

कमल हसन हे आपल्या अभिनयसोबतच पटकथा लेखक आणि फ़िल्म निर्माता म्हणून देखील ओळखले जातात. कमल हसन हे अष्टपैलू कलाकार आहे. त्यांनी विविध भाषेत अनेक हिट चित्रपट दिले. कमल हसन बहुतकरून साऊथ इंडस्ट्रीमध्ये जास्त कार्यरत आहे. असे असले तरी त्यांनी हिंदी सिनेमात देखील त्यांच्या अभिनयाची ताकद दाखवली आहे. आजही कमल हसन यांची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. मात्र असे असूनही ते प्रेमाच्या बाबतीत अपयशी ठरले त्यांच्या आयुष्यात ५ स्त्रिया आल्या त्यातील २ महिलांशी त्यांनी लग्न सुद्धा केले मात्र दुर्दैवाने हे दोन्ही लग्न जास्तकाळ टिकले नाही.

कमल हसन यांच्या आयुष्यात सर्वप्रथम आलाय त्या ‘श्रीविद्या’. श्रीविद्या कमल यांच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या होत्या. श्रीविद्या आणि कमल यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. पडद्यावर त्यांची जोडी हिट ठरली मात्र प्रत्यक्षात ते काही वर्षांनी वेगळे झाले. काही वर्षांनी कमल यांच्या जीवनात वाणी गणेशन यांची एंट्री झाली. वाणी आणि कमल यांनी लग्न केले. मात्र काही कारणांनी लग्नाच्या १० वर्षानंतर ते दोघ वेगळे झाले.

कमल हसन यांच्या आयुष्यात सारिका आल्या. सारिका आणि कमल हे काही दिवस लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिले आणि नंतर त्यांनी लग्न केले. लग्नानंतर त्यांना श्रुती आणि अक्षरा या दोन मुली झाल्या. सगळं सुरळीत असतांना त्यांच्या आयुष्यात पुन्हा चौथी स्त्री आली गौतमी. त्यामुळे कमल हसन यांनी सारिकाला घटस्फोट दिला. मात्र गौतमी आणि कमल यांचेही नाते जास्त काळ टिकले नाही.

काही काळाने कमल हसन आणि सिमरन बग्गा यांच्या नात्याच्या चर्चा होऊ लागल्या. सिमरन कमल यांच्यापेक्षा तब्बल २२ वर्षांनी लहान होती. मात्र हेही नाते लवकरच संपुष्टात आले.

हे देखील वाचा