Friday, April 3, 2026
Home बॉलीवूड या अभिनेत्याचे लिगामेंटमध्ये दुखापत असूनही थांबले नाहीत पाय, एका पायावर पूर्ण केला होता डान्स

या अभिनेत्याचे लिगामेंटमध्ये दुखापत असूनही थांबले नाहीत पाय, एका पायावर पूर्ण केला होता डान्स

प्रभू देवा हे एक लोकप्रिय अभिनेते, नर्तक, नृत्यदिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते आहेत. पण ‘उर्वशी उर्वशी’ आणि ‘मुकाबला या त्यांच्या गाण्यांमुळे चाहते त्यांना एक डान्सर म्हणून सर्वाधिक पसंत करतात. मात्र फार कमी लोकांना हे माहीत आहे, की 1994 साली ‘कादलन’ चित्रपट आला होता. आणि या या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान, त्यांना दुखावत झाल्याने झाल्याने असह्य वेदना सहन करावे लागल्या आणि तसेच हे गाणे चित्रित करण्यासाठी एका पायावर उभे राहून काम केले होते. पण आजही यातील गाण्याची क्रेझ कमी झाली नाही. तर या गाण्यासाठी रहमान यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज वापरलेला आहे.

आजही ‘मुकाबला’ या गाण्यावर लोकांचे पाय थिरकतात. प्रभू (prabhu)देवाच्या अतुलनीय नृत्यशैलीने प्रत्येकजण थक्क झाला होते.   एका मुलाखतीत तो म्हणाला, मुकाबला गाण्यापूर्वी, ‘कादलान’ चित्रपटात आमचं एक फाईट सीन होतं आणि त्याचं शूटिंग करताना माझा एक लिगामेंट फाटला. मला ते कळलंच नाही, लिगामेंट म्हणजे काय हेसुद्धा मला माहीत नव्हतं. पण मी चालूसुद्धा शकत नव्हतो. ‘एन्नावाले’ गाण्यात मी अजिबात चाललो नाही. मी फक्त एका छोट्या सीनसाठी चाललो. ‘एन्नावाले’नंतर मला ‘मुकाबला’चं शूटिंग करायचं होतं.

प्रभू देवा यांनी पुढे स्पष्ट केले, घरी परत आल्यावरच मला वेदना जाणवल्या. नाचताना मला कशाचीही पर्वा नव्हती. मी पट्टी इतकी घट्ट बांधली होती की माझा बूटसुद्धा घट्ट होत होता. वेदनेपेक्षा ती क्रेप पट्टीच माझ्यासाठी जास्त त्रासदायक होती. तर आजही प्रभू देवा यांना मानतात. आणि त्याचे आजपर्यतचे काम हे उत्तमच आणि आँल राउडर सारखे आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

कधीकाळी घरची परिस्थिती पाहून आपल्यानीच केलं होतं दूर, आज तोच व्यक्ती आहे बॉलिवूड स्टार

हे देखील वाचा