Sunday, December 8, 2024
Home मराठी ‘मी खरंच माफी मागतो’ देवमाणूस फेम एकनाथ गीते यांची ‘ती’ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

‘मी खरंच माफी मागतो’ देवमाणूस फेम एकनाथ गीते यांची ‘ती’ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

टेलिव्हिजनवर किंवा चित्रपटांमध्ये जर प्रेक्षकांनी एखाद्या कलाकृतीला प्रेम दिले तर त्यातले सर्वात छोटे पात्र देखील कायम त्यांच्या स्मरणात राहते. प्रेक्षक फक्त मोठमोठ्या कलाकारांना ओळखता असे अजिबातच नाही. ते लहान कलाकरांना देखील भरभरून प्रेम देतात. अशाच प्रेक्षकांच्या मोठ्या प्रेमाचा अनुभव मराठी टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या एका अभिनेत्याला नुकताच आला. झी मराठीवरील ‘देवमाणूस’ ही मालिका तुफान गाजली. प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरून प्रेमाला पाहून चॅनेलने मालिकेचा दुसरा सिझन देखील सुरु केला होता. अजितकुमार देव ही मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याला तर या मालिकेने माफ लोकप्रियता मिळवून दीली. त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक देखील केले गेले. याच मालिकेत अभिनेते एकनाथ गीते यांनी विजय शिंदे ही भूमिका साकारली होती.

एकनाथ गीते यांची ‘विजय शिंदे’ ही भूमिका छोटी असली तरी लक्षात राहणारी होती. मालिका संपल्यानंतर आता एकही महिने उलटून गेले असले तरी लोकं एकनाथ यांना विसरलेले नाही. नुकताच एकनाथ यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांना सर्वच माध्यमातून शुभेच्छा मिळाल्या आता या शुभेच्छांवर त्यांनी सर्वांना धन्यवाद म्हणणारी एक पोस्ट शेअर केली आहे. एकनाथ यांनी फेसबुकवर त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, “काल सकाळी मी उठून माझा फोन बघितला तर ७८ miss calls होते. मी सर्वांना call back नाही करू शकलो Sorry. १४० च्या आसपास insta stories add केल्या, नंतर काही stories add होत नव्हत्या, fail झाल्या त्यासाठी सॉरी, काही Facebook posts miss झाल्या असतील माझ्याकडून, बऱ्याच जणांना WhatsApp, Messenger आणि Text वर रिप्लाय करू शकलो नाही, त्यासाठी सुद्धा Sorry. मी खरंच माफी मागतो सर्वांची……..पण तुम्ही सर्वानी जे भरभरून, इतकं सारं प्रेम दिलं आणि माझा वाढदिवस “स्पेशल” बनवलात त्याबद्दल मी ऋणी राहिन सर्वांचा….. तुमचं असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्यासोबत असु द्या… थँक यू आणि लव्ह यू”.

एकनाथ गीते यांनी देवमाणूस मालिकेआधी ‘तू अशी जवळी रहा’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘जागते रहो महाराष्ट्र’, ‘श्री गुरुदेव दत्त’, ‘देव पावला’, ‘घेतला वसा टाकू नको’ अशा मालिकेत काम केले. सोबतच त्यांनी ‘तांडव’ चित्रपटातही भूमिका साकारली होती. मात्र देव माणूस मालिकेनंतर त्यांना अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी विमानतळावर ‘बाॅयफ्रेंड’साेबत झाली स्पाॅट, पॅपराझींची नजर पडताच लाजली अभिनेत्री

कुटुंबाने का केले नाहीत तारक मेहता यांचे अंत्यसंस्कार? घ्या कारण जाणून…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा