‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड म्हणतोय, ‘मी रुसलोय’, नेमकी काय आहे की भानगड?

devmanus fame kiran gaikwad said he is upsets see whats happen with him


एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते. मात्र त्या व्यक्तीच्या चांगुलपणाच्या मागे राक्षसी चेहरा देखील असू शकतो, असे सांगणारी मालिका म्हणजेच ‘देवमाणूस’. झी मराठी या चॅनलवर प्रसारित होणारी या मालिकेची लोकप्रियता या दिवसांत गगनाला भिडली आहे. मालिकेतील सरू आजी, डिम्पल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या, मंजुळा आणि डॉ. अजित कुमार देव ही पात्रं सध्या रसिकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. यातीलच एक लोकप्रिय अभिनेता आहे किरण गायकवाड, म्हणजेच मालिकेतील ‘डॉ. अजित कुमार देव’.

किरण गायकवाड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असतो. आपल्या कामाशी संबंधित सर्व अपडेट्स तो चाहत्यांसोबत शेअर करतो. यासोबत आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून तो चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी गमावत नाही. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो आता इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. हा व्हिडिओ पाहून नेटकरी गोंधळात पडले आहेत. कारण यात अभिनेता रुसलेला दिसत आहे.

किरणने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो वराच्या वेशात दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, यात किरण म्हणतोय, “रुसलोय मी!” वास्तविक हा एक रील व्हिडिओ आहे, ज्यामध्ये अभिनेता ‘खबरदार’ चित्रपटातील ‘धुमशान अंगात आलं’ या गाण्यावर अभिनय करत आहे.

हा व्हिडिओ मालिकेच्या सेटवरचा आहे. व्हिडिओ शेअर करत किरणने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “होय होय.” हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना चांगलाच पसंत पडल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ खाली कमेंट करून, चाहते त्याच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. अल्पावधीतच व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडला आहे.

अभिनेता किरण गायकवाड यापूर्वी ‘लागीर झालं जी’ मध्ये दिसला होता. यातील त्याचे पात्र विशेष गाजले. नकारात्मक भूमिका असूनही, त्याने प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले. आता त्याचे ‘देवमाणूस’ मधील पात्र देखील खूप पसंत केले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.