Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

लाडक्या ‘गोपी बहू’ने बिकिनीमध्ये केला ‘असा’ डान्स; युजर्स म्हणाले, ‘हे तू नेमकं काय दाखवतेय?’

चित्रपटसृष्टीमध्ये आणि टीव्ही मालिकेत असलेले कलाकार आपल्या चाहत्यांसाठी आणि प्रसिद्धीसाठी काही ना काही करतच कसतात. आपल्या अभिनयाच्या जोरावर ते आपल्या चाहत्यांची मने जिंकतात. शिवाय आपल्या चाहत्यांना खुश ठेवण्यासाठी सोशल मीडियावर कायमच सक्रिय राहतात. कलाकार आपल्या दैनंदिन जीवनातील व इतर गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. चाहत्यांना देखील आपल्या आवडत्या कलाकारांविषयी अशी माहिती जाणून घेणे फार आवडते. आपल्या आवडीच्या कलाकाराने एखादी पोस्ट शेअर केली की, चाहत्यांच्या कमेंट्सचा आणि लाईक्सचा पाऊस पडतो. अशातच काही कलाकार विशेषतः अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांवरून ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. सध्या या ट्रोलिंगच्या भोवऱ्यात टीव्हीची गोपी बहू सापडली आहे.

‘साथ निभाना साथिया’ फेम अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने (गोपी बहू) नुकतेच सोशल मीडियावर आपले बिकिनीमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने पिवळ्या रंगाची बिकीनी परिधान केली आहे. नो मेकअप लुकमध्येही अभिनेत्रींचे रूप खुलून आले आहे. तिच्या फोटोसोबतच तिने डान्स करतानाचा एक व्हिडिओ देखील आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. (devoleena bhattacharjee aka gopi bahu yellow bikini dance video viral)

यामध्ये तिच्या आजूबाजूला संपूर्ण हिरवळ आहे आणि ती बिकनीवर डान्स करत आहे. अभिनेत्रीने बेली डान्सचे क्लासेस लावलेले आहेत. याची माहिती आपल्या चाहत्यांना मिळावी, म्हणून तिने हा डान्स केला असावा. तसं पाहिले, तर अभिनेत्रीचा हा डान्स तिच्या चाहत्यांना काही फार आवडलेला नाही. त्यामुळे तिला अनेकजण ट्रोल करत आहेत.

अभिनेत्रीने ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेमध्ये गोपी बहूची भूमिका चोखपणे बजावली. या मालिकेमुळेच ती घराघरात पोहचली. यामध्ये तिने साकारलेल्या पात्राने चाहत्यांच्या मनामध्ये घर केले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना अभिनेत्रीला तशा रूपामध्येच पाहायला आवडते. तिच्या बिकनीवरील फोटोंना आणि व्हिडिओला चाहत्यांनी नापसंती दाखवली आहे. अनेकांनी तिला कमेंट करत असं म्हटलं आहे की, “अगं गोपी बहू, हे काय करत आहेस तू.” तर दुसऱ्याने “तुला नेमकं करायचंय तरी काय?” असं विचारलं आहे. तिच्या आणखी एका चाहत्याने असं लिहिलं की, “ती आता तहानलेली सून दिसत आहे.” अशा पद्धतीच्या अनेक कमेंट्सचा आता तिला सामना करावा लागत आहे.

या अभिनेत्रींच्या कारकिर्दीविषयी बोलायचे झाले तर, तिने २०१० मध्ये ‘डान्स इंडिया डान्स’ मध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर तिने ‘दिया और बाती हम’, ‘ये है मोहोब्बते’, ‘कुम कुम भाग्य’, ‘लाल इष्क’, ‘साथ निभाना साथिया’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले. परंतु तिला ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेमुळेच प्रसिद्धी मिळाली. ‘बिग बॉस’च्या १४ व्या पर्वात देखील ही अभिनेत्री सहभागी झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा