Monday, October 14, 2024
Home साऊथ सिनेमा हे आहे देवरा चित्रपटाच्या रिलीजचे वेळापत्रक; रात्री एक वाजेपासून असतील शोज…

हे आहे देवरा चित्रपटाच्या रिलीजचे वेळापत्रक; रात्री एक वाजेपासून असतील शोज…

सध्या ज्युनियर एनटीआर त्याच्या आगामी ‘देवरा‘ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात प्रथमच ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांची रोमँटिक जोडी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. कोरटाला सिवा दिग्दर्शित हा चित्रपट लवकरच २७  सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. स्टार्सही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, चित्रपटाचे मॉर्निंग शो असतील, राज्यभरातील १५ हून अधिक सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये सकाळी १ वाजता स्क्रिनिंग उपलब्ध असेल. याशिवाय, इतर स्क्रीन आणि मल्टिप्लेक्स सकाळी ४ वाजल्यापासून सुरू होतील, दिवसभरात एकूण ६ शो नियोजित आहेत. तेलंगणामध्ये चित्रपटाच्या तिकिटाची किंमत सिंगल स्क्रीनमध्ये २५० रुपये आणि मल्टिप्लेक्समध्ये ४१८ रुपये असेल आणि आंध्र प्रदेशमध्ये मल्टीप्लेक्ससाठी ३२५ रुपये आणि सिंगल स्क्रीनसाठी २०० रुपये या किंमती अपेक्षित आहेत.

‘देवरा’ हा चित्रपट तेलगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळमसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्माते बऱ्याच राज्यांमध्ये प्रमोशनल इव्हेंट्स आयोजित करत आहेत, अलीकडेच ते चेन्नईमध्ये दिसले आणि पुढे ते दक्षिणेतही चित्रपटाचे मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहेत.

युवासुधा आर्ट्स आणि एनटीआर आर्ट्सने ‘देवरा’ ची निर्मिती केली आहे. अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट २७ सप्टेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘आदिपुरुष’नंतर हा अभिनेता पुन्हा एकदा पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. आगाऊ बुकिंगबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्याचा चित्रपट लवकरात लवकर पाहण्यासाठी चाहते तिकीट बुक करण्यास उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

झीनत अमान म्हणतात मी आंटी आहे आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा