Thursday, April 24, 2025
Home व्हिडीओ काय सांगता! युजवेंद्र चहलची पत्नी नाचते अगदी लोण्याप्रमाणे, डान्स व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

काय सांगता! युजवेंद्र चहलची पत्नी नाचते अगदी लोण्याप्रमाणे, डान्स व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

भारतीय संघाचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल नेहमीच चर्चेत असतो. सोबतच त्याची पत्नी धनश्री वर्मा(dhanashri verma) तिच्या उत्तम नृत्याने चर्चेचा विषय बनत असते. ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी केलेले नृत्य शेअर करत असते. मात्र, पुन्हा एकदा धनश्री वर्मानी आपल्या चाहत्यांसाठी एक जबरदस्त असा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि तिचा हा व्हिडिओ ट्रेंड देखील होत आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय कोरिओग्राफर आहे. तिचे व्हिडिओ अनेकदा इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसतात. तिने पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. तिच्या या व्हिडिओला भरभरून लाईक्स सुद्धा मिळत आहेत.

मात्र, भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची, पत्नी धनश्री वर्माने अलीकडेच आपल्या चाहत्यांसाठी एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तिने पांढरा रंगाचा लांब शर्ट आणि काळी पँट घातलेली दिसत आहे. व्हिडिओतील धनश्रीच्या नृत्याचे कौशल तिचे हावभाव हे कोणालाही प्रभावित करू शकतात. या नृत्याने धनश्रीचे पाय लोण्यासारखे हलताना दिसत आहेत. अशा स्थितीत याला लोण्यासारखे नृत्य म्हटले तर वावगे ठरणार नाही.

तिचा व्हिडिओ शेअर करताना धनश्री वर्माने कॅप्शनमध्ये लिहिले की, “बटर आणि चीज, तसेच मला हा लेटेस्ट ट्रेंड वाटत आहे, त्यामुळे अजून प्रतीक्षा करू शकत नाही. खुद्द यूजवेंद्र चाहलनेही आपल्या पत्नीचा जबरदस्त व्हिडिओ इंस्टाग्रामवर लाईक केला आहे. धनश्रीच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून एकापेक्षा एक जबरदस्त कमेंट्स पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओवर एका चाहत्याने कमेंट बॉक्ससवर लिहिले की, “तुझे फुटवर्क क्रिस्टियानो रोनाल्डोपेक्षा चांगले आहे.” त्याला उत्तर देत धनश्रीने लिहिले, “अरे बाप रे, यावर विश्वास ठेवण्यासाठी मला ते पुन्हा वाचावे लागेल,” तर दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट बॉक्ससवर लिहिले, “तुम्ही खरोखर लोण्यासारखेच नाचता.” अशाप्रकारे धनश्रीच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा