व्हिडीओच्या माध्यमातून धनश्री वर्माने दिली गुड न्यूज, लवकर दिसणार…


प्रसिद्ध यूटुबर असणारी धनश्री वर्मा नेहमी तिच्या वेगवेगळ्या व्हिडिओंमुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय असते. क्रिकेटर युजवेंद्र चहल याची बायको असणाऱ्या धनश्रीने सोशल मीडिया चांगले बस्तान बसवले आहे. तिच्या डान्स व्हिडिओला, फिटनेस व्हिडिओला फॅन्सचा दमदार प्रतिसाद मिळतो. यावेळेस मात्र धनश्री एका वेगळ्याच व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.

धनश्रीने नुकताच तिचा एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. यात ती लोकप्रिय पंजाबी गायक जस्सी गिलसोबत दिसत आहे. या व्हिडिओत ती सांगते, ” बिग बिग न्यूज ये मैं हूँ, ये जस्सी हैं और यहा पे हमारी शूटिंग हो रही हैं” लवकरच धनश्री आणि जस्सी एका म्युझिक व्हिडिओच्या निमित्ताने एकत्र येत आहे.

धनश्रीने हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले आहे की, ” खूप खूप मोठी बातमी, ही मी आहे, आणि माझ्यासोबत आहे जस्सी गिल. आम्ही आमच्या एका नव्या गाण्यासाठी एकत्र आले आहोत. हे गाणे तुमच्यासोबत कायमस्वरूपी असणार आहे. जस्सी माझ्याकडे शब्द नाहीये, हे सांगायला की, मी स्वतःला किती भाग्यवान समजत आहे. मला नेहमीच तुझे सर्व गाणे खूप आवडले, मात्र हे गाणे माझे सर्वात फेव्हरेट गाणे झाले आहे. मला या गाण्याचा हिस्सा बनवण्यासाठी तुझे खूप आभार. मी या नवीन गाण्यासाठी खूपच उत्साहित आहे.”

हे गाणे अरविंद खेड यांनी दिग्दर्शित केले असून, रजित देव यांनी गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.