Wednesday, June 11, 2025
Home अन्य युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने आरसीबी संघाची जर्सी घालून केला जबरदस्त डान्स, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने आरसीबी संघाची जर्सी घालून केला जबरदस्त डान्स, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू युझवेंद्र चहलची पत्नी आणि प्रसिद्ध यूट्यूबर धनश्री वर्मा ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने पाहिले जातात. प्रेक्षकांना देखील तिचे डान्स व्हिडिओ खूप आवडतात. त्यामुळे ती तिचे व्हिडिओ नेहमी शेअर करत असते. अशातच धनश्री वर्माचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप गाजतोय. या व्हिडिओमध्ये ती वेगळ्या अंदाजात डान्स करताना दिसत आहे. धनश्री ‘शी मेक इट क्लप’ या गाण्यावर मुव्हज करत आहे. तिच्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांसोबत अनेक कलाकार देखील कमेंट करत आहेत.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, धनश्रीने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ची जर्सी घातली आहे. या व्हिडिओमध्ये तिचा अंदाज आणि मोकळ्या सोडलेल्या केसांमुळे ती सगळ्यांना दीवाना करत आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओला काही मिनिटांतच लाखो लाईक्स मिळाले आहेत. धनश्रीने तिचा हा डान्स व्हिडिओ खूप दिवसांनंतर पोस्ट केला आहे.

धनश्रीच्या सासू- सासऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती स्वतः धनश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून सर्वांना दिली होती. या आधी धनश्रीने तिच्या आईसोबत डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. तिचा हा व्हिडिओ देखील प्रेक्षकांना खूप आवडला होता. या व्हिडिओमध्ये ‘ताल से ताल मिला’ या गाण्यावर डान्स करताना दिसली होती. या व्हिडिओला 10 मिलियन पेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले होते.

धनश्री वर्मा ही एक डॉक्टर (डेंटिस्ट) आहे. तसेच ती एक कोरिओग्राफर देखील आहे. सोशल मीडियावर ती तिचे डान्स व्हिडिओ नेहमीच शेअर करत असते. 2020 मध्ये धनश्रीने युझवेंद्र चहलसोबत लग्न केले. त्यांनतर ती अजूनच लाईमलाईटमध्ये आली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ओव्हर ऍक्टिंगचे दुकान’, ‘खड तैनू मैं दस्सा’ गाण्यावरील नेहा कक्करचे एक्सप्रेशन्स पाहून युजरची कमेंट

-तूफानों से’ गाणं म्हणत कैलाश खेर, शिबानी कश्यप अन् सुदेश भोसले यांनी केला कोरोना योद्धांना सलाम

-‘मास्क लावायचे ज्ञान देत होती, आता..’, हर्षाली मल्होत्राचे बीचवरील फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

हे देखील वाचा