भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्माने तिच्या डान्सच्या जोरावर जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. तिचे डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर बर्याचदा व्हायरल होतात. अशीच परिस्थिती तिचा आणखी एक ब्लॅक ऍंड व्हाईट व्हिडिओ समोर येत आहे, ज्यात ती डान्सर आणि कोरिओग्राफर जिगर ठाकरसोबत अतिशय उत्कृष्ट स्टाईलमध्ये नाचताना दिसत आहे.
हा ब्लॅक ऍंड व्हाईट व्हिडिओ धनश्रीने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिचा डान्स आणि एक्सप्रेशन्स अगदी पाहण्यासारखे आहेत, ज्याला आतापर्यंत तब्बल २ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये दोघे ‘एक लडकी भीगी भागी सी’ या गाण्यावर डान्स करत आहेत.
धनश्री वर्माने हा व्हिडिओ शेअर करत धनश्रीने लिहिले आहे, “रील फॉर्ममध्ये ओल्ड इज गोल्डचे सार सादर करताना. माझे आवडत्या क्लासिक गाण्यांपैकी एक.” विशेष म्हणजे यात दोघांच्या डान्स स्टेप्स आणि मूव्ह्ज आश्चर्यकारक दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, चाहते त्या दोघांचे तोंडभरून कौतुक करत आहेत.
धनश्री वर्माने तिच्या डान्सद्वारे प्रेक्षकांची मने जिंकण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, धनश्री वर्मा क्रिकेटर श्रेयस अय्यर, शिखर धवनसोबत देखील नाचताना दिसली आहे.
धनश्री वर्माच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती व्यवसायाने एक डॉक्टर आहे. पण डान्सच्या माध्यमातून तिला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. ती एक कोरिओग्राफर देखील आहे. काही दिवसांपूर्वी गायक जस्सी गिलसह तिचे ‘ओये होये होये’ हे गाणे रिलीज झाले होते, जे यूट्यूबवर 21 लाखाहून अधिक वेळा पाहिले गेले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…