Saturday, June 29, 2024

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने समुद्रकिनारी केला ‘अब के बरस’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहून चाहतेही भलतेच खुश

भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ही सोशल मीडियावर इतर कलाकारांप्रमाणेच मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या सासू सासऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. मागील काही दिवसांपासून ती इंस्टाग्रामपासून लांब होती, पण आता तिने इंस्टाग्रामवर पुन्हा एकदा शानदार प्रवेश केला आहे. तिच्या डान्स स्टाईलसाठी ओळखली जाणारी धनश्री वर्मा आता पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे.

तिचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते पुन्हा एकदा नव्याने तिच्या प्रेमात पडले आहेत. तिने समुद्रकिनारी वाळूवर हा व्हिडिओ केला आहे. हा व्हिडिओ तिने 90 च्या दशकातील, ‘अब के बरस’ या गाण्यावर वैशाली कलांजेय आणि पायल शाहसोबत मिळून बनवला आहे.

धनश्री वर्माने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, धनश्री तिच्या पार्टनर्ससोबत जोरदार डान्स करत आहे. तिचा हा डान्स नेहमी प्रमाणेच तिच्या चाहत्यांनी खूप आवडला आहे. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत दोन लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तिचे चाहते तिला कमेंट करून कौतुक करत आहेत, तर एका चाहत्याने विचारले की, “चहल भाई कुठे आहे.”

धनश्री वर्मा ही एक डेंटिस्ट आहे. तसेच ती एक कोरिओग्राफर देखील आहे. सोशल मीडियावर ती तिचे डान्स व्हिडिओ नेहमीच शेअर करत असते. 2020 मध्ये धनश्रीने युझवेंद्र चहलसोबत लग्न केले. त्यांनतर ती लाईमलाईटमध्ये आली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फिटनेस असावा तर असा! शाहिद कपूरची पत्नी मीराने केला आंब्याच्या झाडाला लटकून व्यायाम; एकदा पाहाच

-सनी लिओनीने चाहत्यांना दिले ‘हे’ खतरनाक चॅलेंज, भल्या- भल्यांना फुटेल घाम घाम

-अरे व्वा! आणखी ७८ वर्षे सोनी मॅक्सवर दिसणार ‘सूर्यवंशम’ चित्रपट, कारणही आहे तितकंच रंजक

हे देखील वाचा