Thursday, June 12, 2025
Home अन्य ‘युझीने किती सोमवार उपवास केले होते?’, युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माचे पूलसाईड फोटो पाहून चाहत्याने केली भन्नाट कमेंट

‘युझीने किती सोमवार उपवास केले होते?’, युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माचे पूलसाईड फोटो पाहून चाहत्याने केली भन्नाट कमेंट

प्रसिद्ध यूट्यूबर धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि सतत पोस्ट्स शेअर करत राहते. दरम्यान, तिची एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पूलच्या बाजूला बसून फोटोसाठी सुंदर पोज देत आहे. या फोटोंमध्ये धनश्रीची मनमोहक अदा पाहायला मिळत आहेत.

हे फोटो शेअर करत तिने एक कॅप्शनही दिले आहे. तिने लिहिले, “मी एअर पॉड्ससह पूलच्या बाजूला बसली आहे, कारण एक नवीन प्लेलिस्ट तयार होत आहे.” धनश्री वर्माच्या या फोटोमध्ये तिच्यासमोर एअर पॉडही ठेवलेला दिसला आहे.

धनश्री वर्माची कोणतीही पोस्ट येताच व्हायरल होऊ लागते. अशामध्ये तिचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. युजर्स या पोस्टवर कमेंट्स करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कमेंट करत एका चाहत्याने लिहिले की, “युझीने किती सोमवार उपवास केले होते?” त्याचवेळी दुसर्‍या युजरने लिहिले की, “मॅम यावेळी हार्दिक सरसोबत डान्स करा ना.” हे लक्षात घेण्यासारखे आहे की, यापूर्वी धनश्री वर्माने, शिखर धवनसोबत डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. जो सोशल मीडियावर खूप ट्रेंड झाला होता.

धनश्री वर्मा व्यवसायाने डॉक्टर आहे आणि ती कोरिओग्राफीही करत असते. ती नेहमी तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत राहते. 2020 साली धनश्रीने भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलशी लग्न केले होते. धनश्री वर्माचे नाव युझवेंद्रसोबत जुळल्याने ती खूप चर्चेत आली. नुकताच त्यांच्या लग्नाचा व्हिडिओही धनश्रीने तिच्या यूट्यूब चॅनलवर रिलीझ केला. ज्याला चाहत्यांना खूप चांगला प्रतिसाद दिला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पारंपारिक ड्रेसमध्ये ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित दिसतेय एकदम भारी! तब्बल ‘इतक्या’ किमतीत तुम्हीही घेऊ शकता विकत

-‘मॉर्डन रांझा’ गाण्यावर नेहा कक्करने लावले ठुमकेे; चाहत्यांसह पती रोहनप्रीत सिंगनेही केले कौतुक!

-जॉनी लिव्हरच्या मुलीने केला अक्षय कुमारच्या गाण्यावर जोरदार डान्स, व्हिडिओ पाहून थिरकतील तुमचेही पाय

हे देखील वाचा