Wednesday, July 3, 2024

‘गब्बर’ धवनसोबत थिरकली युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, भांगडा नृत्य करत वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्माने तिच्या डान्सच्या जोरावर जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. तिचे डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर बर्‍याचदा व्हायरल होतात. अशामध्ये तिचा आणखी एक व्हिडिओ समोर येत आहे, ज्यात ती क्रिकेटपटू शिखर धवनसोबत जबरदस्त स्टाईलमध्ये भांगडा करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये ‘गब्बर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धवनचे आणि धनश्रीचा डान्स तसेच एक्सप्रेशन्स अगदी पाहण्यासारखे आहेत. हा डान्स व्हिडिओ धनश्री वर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

धनश्री वर्मा तिच्या व्हिडिओमध्ये शिखर धवनसोबत जबरदस्त स्टाईलमध्ये भांगडा करताना दिसली. हा व्हिडिओ शेअर करत धनश्रीने लिहिले आहे, “गब्बरच्या स्टाईलमध्ये भांगडा, दोघांनी मिळून इंस्टाग्राम रीलला आग लावली. मी आधीच सांगितल्याप्रमाणे, ऊर्जा बोलते.” यात दोघांच्या डान्स स्टेप्स आणि ऊर्जा आश्चर्यकारक दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, चाहते त्या दोघांचे तोंडभरून कौतुक करत आहेत.

धनश्री वर्माने तिच्या डान्सद्वारे प्रेक्षकांची मने जिंकण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, धनश्री वर्मा क्रिकेटपटू श्रेयस अय्यरसोबतही नाचताना दिसली होती.

धनश्री वर्माच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती व्यवसायाने एक डॉक्टर आहे. पण डान्सच्या माध्यमातून तिला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. ती एक कोरिओग्राफर देखील आहे. काही दिवसांपूर्वी गायक जस्सी गिलसह तिचे ‘ओये होये होये’ हे गाणे रिलीझ झाले होते, जे यूट्यूबवर 21 लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले.

इंस्टाग्रामवर तिचे 33 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, तर यूट्यूबवर तिच्या सबस्क्राईबरची संख्या 20 लाखांहून अधिक आहे. धनश्री वर्मा अनेकदा तिचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोबाईलच्या दुकानाला सोनू सूदचं नाव, ‘१०० रुपयांचा रिचार्ज मिळेल का?’ म्हणत अभिनेत्याचा मजेशीर अंदाजात प्रतिसाद

-‘सगळं ठीक तर आहे ना?’ म्हणत सुष्मिताच्या भावनिक पोस्टवर चाहत्यांची प्रतिक्रिया

-व्हिडिओ! ‘कुछ तो है’ मालिकेच्या सेटवरही दिसली होळीची मस्ती, अभिनेत्री कृष्णा मुखर्जीकडून मजेशीर व्हिडिओ शेअर

हे देखील वाचा