Wednesday, October 15, 2025
Home अन्य ‘सौदा खरा खरा’ म्हणत धनश्री वर्माने शेअर केला डान्स व्हिडिओ; चाहत्यांना पुन्हा पाहायला मिळाले तिचे धमाकेदार नृत्य!

‘सौदा खरा खरा’ म्हणत धनश्री वर्माने शेअर केला डान्स व्हिडिओ; चाहत्यांना पुन्हा पाहायला मिळाले तिचे धमाकेदार नृत्य!

धनश्री वर्मा कोणी सेलिब्रेटी नाही पण सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवलेली नृत्यांगना आहे. असे असले तरी ती तिचा क्रिकेटपटू पती युझवेंद्र चहलपेक्षा कमी प्रसिद्धही नाही. सोशल मीडियावर धनश्रीची जबरदस्त चाहते आहेत.  ती पेशाने लोकांवर उपचार करणारी डॉक्टर आहे, परंतु तिला नृत्याचीही खूप आवड आहे. ती अनेकदा तिचे नृत्याचे व्हिडिओ शेअर करत असते.

क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माचे नृत्यासाठीचे वेड सतत वाढत आहे. असाच तिचा एक डान्स व्हिडिओ आजकाल इंटरनेटवर पुन्हा व्हायरल होत आहे. धनश्रीने तिचा हा डान्स व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘सौदा खरा खरा’ या गाण्यावर जबरदस्त शैलीत नाचताना दिसत आहे.

तिच्या डान्सचे मूव्हज बघून चाहतेही जोरदार लाईक आणि कमेंट करत आहेत. या व्हिडिओसोबत धनश्रीने कॅप्शन लिहिले, “जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, पार्ट टू हाजीर आहे. काही लोक जिथे जातात तिथे आनंद पसरवतात, तर काही लोक जिथे जिथे जातात तिथे उर्जेसह आनंद मिळवतात.”

वास्तविक, काही दिवसांपूर्वी धनश्रीने याच गाण्यावर तिचा एक भांगडा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्येही धनश्रीच्या डान्स स्टेप्स चाहत्यांना खूप आवडल्या. हा व्हिडिओ शेअर करत तिने “इस्सा वाईब” असे कॅप्शन दिले आहे. पुढे तिने लिहले, “३० सेकंदांपेक्षा कमी? काळजी करू नका, पार्ट २ लवकरच येईल.” धनश्री वर्माचा हा डान्स व्हिडिओ ३ लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

धनश्री वर्मा ही डॉक्टर असून, शिवाय कोरिओग्राफर आणि यूट्यूबरही आहे. तिचे इंस्टाग्रामवर ३६ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत, तर युट्यूबवर तिच्या सबस्क्राईबर्सच्या संख्येने जवळपास २० लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

हे देखील वाचा