Wednesday, August 6, 2025
Home मराठी धनश्री काडगावकरने जिंकली कोल्हापूरकरांची मनं; म्हणाली, ‘इथं आलं की…

धनश्री काडगावकरने जिंकली कोल्हापूरकरांची मनं; म्हणाली, ‘इथं आलं की…

मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकरने आत्तापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत, पण त्यातही तिने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत साकारलेल्या वहिनीसाहेबांचे पात्र सर्वाधिक गाजले. ही मालिका कोल्हापूरकरांसाठी सर्वात जवळची ठरली कारण, मालिकेची पार्श्वभूमीच कोल्हापूरमधील होती. त्यामुळे या मालिकेतील कलाकारांचे कोल्हापूरशी जवळचे नाते तयार झाले आहे. याचाच प्रत्येय धनश्री काडगावकरच्या पोस्टवरून आला आहे.

धनश्रीने नुकतीच कोल्हापूरला भेट दिली असून तिने देवी अंबाबाईचेही दर्शन घेतले आहे. तिने कोल्हापूर भेटीचे फोटोही शेअर केले असून ‘इथे आलं की घरी आल्यासारखच वाटतं’, असं कॅप्शनही दिलंय. तिच्या पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा