मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. तिने झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून सर्वांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. यात तिने ‘वहिनीसाहेब’ ही भूमिका साकारली होती. धनश्री देखील इतर कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती प्रेक्षकांना तिच्याबाबत माहिती देत असते. अशातच धनश्रीचा एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
धनश्रीने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. ती सध्या ट्रेंडिंग असलेल्या म्युझिकवर थिरकली आहे. या व्हिडिओमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. त्या ड्रेसवर कार्टूनचे चित्र आहे.
तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे. तिला सगळेजण कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “राडाच ना ताई.” हा व्हिडिओ मोठ्या संख्येने व्हायरल होत आहे.
धनश्रीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका निभावली होती. या भूमिकेने तिला खूप ओळख दिली. परंतु काही दिवसांनी गरोदर असल्याने तिने ही मालिका सोडून दिली. धनश्रीने मागच्या वर्षी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ती तिच्या मुलासोबतचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असते. धनश्रीने या आधी ‘चिठ्ठी’, ‘ब्रेव हार्ट’, ‘गंध फुलाचा गेला सांगून’ या मालिकांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-फक्त शर्ट घालून अभिनेत्री दीपिका सिंगने केले सिझलिंग फोटोशूट, पाहून तुमचंही हरपेल भान