Monday, June 24, 2024

आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीमधील थरार मोठ्या पडद्यावर, सुनील शेट्टी घेवून येतोय ‘धारावी बॅंक’

धारावी, स्वप्नांचे शहर, मुंबईचा परिसर जिथे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी वसलेली आहे. या झोपडपट्ट्यांमध्ये चार लाखांहून अधिक लोक राहतात. म्हणजे चार लाख स्वप्ने, चार लाख आशा, चार लाख प्रेमकथा, चार लाख द्वेष आणि कदाचित तेवढ्याच प्रमाणात शत्रुत्व. या झोपडपट्ट्यांच्या गल्लीबोळात किती हाल होत असतील याची कल्पना न लिहलेलीच बरी.  इथे प्रेमपत्रे लिहिली जायची. द्वेषाच्या कथा रंगवल्या जायच्या. काहींना या झोपडपट्ट्यांच्या पलीकडे जाऊन आभाळाशी स्पर्धा करायची होती, तर काहींना गुन्हेगारीच्या दलदलीत बुडालेलं असतं. सुनील शेट्टी आणि विवेक ओबेरॉय धारावीच्या झोपडपट्टीतून उद्भवलेली अशीच एक न सांगणारी कहाणी घेऊन येत आहेत. सोबत असेल सुंदर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. या नवीन वेब सिरीजचे नाव ‘धारावी बँक’ आहे, जी लवकरच MX Player वर प्रसारित होणार आहे.

‘आश्रम’, ‘भौकाल’ आणि ‘रक्तांचल’ यांसारख्या वेब सीरिजनंतर आता एमएक्स प्लेयर आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीची जोरदार कथा घेऊन येत आहे. या क्राईम आणि थ्रिलरवर आधारित वेबसिरीज अण्णा म्हणजेच सुनील शेट्टीची स्टाईल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, जी आतापर्यंत पडद्यावर दाखवली गेली नाही. सोबत विवेक ओबेरॉयही दमदार भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही आपल्या दमदार अभिनयाची छलक दाखवताना दिसणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by TimesOTT (@timesott)

 

या वेबसिरीजचे बहुतांश शूटिंग धारावी परिसरात झाले आहे. वास्तव्यास असलेल्या झोपड्यांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. गुन्हेगारी आणि रहस्यांनी भरलेल्या या वेब सिरीजचे दिग्दर्शन समित कक्कर यांनी केले आहे. ‘धारावी बँक’ बद्दल बोलताना, गौतम तलवार, मुख्य सामग्री अधिकारी, एमएक्स प्लेयर म्हणतात, “धारावी बँक ही एक अनोखी गुन्हेगारी, थरारक आणि सूडाची कथा आहे जी तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. पुढच्या क्षणी काय होणार आहे याचा अंदाज तुम्ही कधीच लावू शकणार नाही. आमच्या कथेशी जुळणारे एक परिपूर्ण वातावरण आम्ही तयार केले आणि त्यासाठी आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली.

हे देखील वाचा