Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड जान्हवी, आलिया आणि अनन्यानंतर आता करण जोहर ‘या’ अभिनेत्याच्या मुलीला करणार लाँच, व्हिडिओ केला रिलीज

जान्हवी, आलिया आणि अनन्यानंतर आता करण जोहर ‘या’ अभिनेत्याच्या मुलीला करणार लाँच, व्हिडिओ केला रिलीज

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रुही’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचवेळी कपूर कुटुंबातील आणखी एक देखणी मुलगी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. होय, संजय कपूरची मुलगी शनाया कपूर जुलैमध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, याची 22 मार्च रोजी घोषणा करण्यात आली आहे. धर्मा प्रॉडक्शनचा टॅलेंट सांभाळणार्‍या बंटी सजदेहने नुकताच शनाया कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, जो आता व्हायरल होत आहे.

शनाया बोनी कपूर व अनिल कपूर यांचे छोटे भाऊ संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी आहे. बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूरने यश राज फिल्म्सच्या ‘इश्कजादे’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, तर करण जोहरने जान्हवीला ‘धडक’मधून बॉलिवूडमध्ये आणले होते.

जेव्हापासून शनायाने आपले सोशल मीडिया अकाउंट सार्वजनिक केले आहे, तेव्हापासून ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. शनायाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले, तरी सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोविंग एखाद्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही. अशा परिस्थितीत आता शनायाचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, शनाया कपूर आता बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. जिथे ती लवकरच आमच्या स्क्रीनवर दिसेल. अभिनेत्री धर्मा प्रॉडक्शनसोबतच तिच्या पहिल्या चित्रपटाद्वारे पदार्पण करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी शनाया कपूर आणि करण जोहर ऑफिसच्या बाहेर स्पॉट झाले होते. ज्यामुळे सर्वांना वाटत होते की, तिला धर्मा प्रॉडक्शनमधूनच लाँच केले जाईल. हे आता खरे झाल्याचे दिसून येत आहे.

शनाया कपूरने ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ या जान्हवी कपूरच्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. याशिवाय शनाया ‘फॅब्युलस लाईव्ह्ज ऑफ बॉलिवूड वाईव्ह्ज’ नावाच्या वेब सीरिजमध्येही दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा- 

-विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा चढणार लग्नाच्या बोहल्यावर? अभिनेत्याने केली मोठी घोषणा

-‘या’ अभिनेत्याचे ट्रान्स्फॉर्मेशन पाहून तुम्ही व्हाल थक्क, केले तब्बल १८ किलो वजन कमी

-नादच खुळा! यूट्यूबवर १०० कोटी व्ह्यूजचा टप्पा पार करणारी पहिली युवा गायिका; ‘या’ दोन गाण्यांनी बनवला विक्रम

हे देखील वाचा