Tuesday, July 9, 2024

‘डान्स दीवाने ३’च्या कंटेस्टेंटला धरम पाजींकडून ५१ रुपयांचा ‘शगून’, सोबतच सांगितली भावनिक कहाणी

एकेकाळी आपल्या अभिनयाने आणि स्टाईलने सगळ्यांना भुरळ घालणारे बॉलिवूडमधील अभिनेते धरम पाजी म्हणजेच धर्मेंद्र. ते त्यांचे सहअभिनेता आणि मित्र शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी रियॅलिटी शो ‘डान्स दीवाने 3’ मध्ये गेले होते. माधुरी दीक्षित, तुषार कालिया, धर्मेंद्र येलांडे हे शो जज करतात. या शोमध्ये एक असा क्षण आला होता जेव्हा धर्मेंद्र यांनी एका स्पर्धकाचा‌ परफॉर्मन्स बघून 51 रुपये ‘शगून’ म्हणून दिले होते. परंतु त्यांनी 51 रुपयेच का दिले. या बाबत त्यांनी एक भावनिक कारण सांगितले आहे.

पल्लवी टोल्ये या मुलीने शत्रुघ्न सिन्हा यांच्या कालिचरण या चित्रपटातील ‘जा रे जा ओ हरजाई’ या गाण्यावर तिने जबरदस्त डान्स केला होता. या तिच्या डान्सने दोन्हीही पाहुणे खूप प्रभावित झाले. पल्लवीचा हा डान्स पाहून शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, “खरंच आज तुझ्याकडे पाहून समजलं की, डान्स करायला वयाचं बंधन नसतं.”

तिथेच धर्मेंद्र यांनी पल्लवीला 51 रुपये बक्षीस म्हणून दिले. 51 रुपयेच का? या गोष्टीमागचा खुलासा करत धर्मेंद्र यांनी सांगितले की,”मी माझा पहिला चित्रपट ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ हा होता. या चित्रपटाला साईन करण्यासाठी मला बोलवले होते. तिथे 3 केबिन होत्या आणि मी मधल्या केबिनमध्ये बसलो होतो, तेव्हा तिथे तीन निर्माते होते. मला ऐकू येत होते, ‘याला किती द्यायचे यार.’ त्यावर त्यांनी ठरवले आणि 17- 17 असे मला 51 रुपये दिले होते. ही माझी पहिली कमाई होती. त्यामुळे मी 51 रुपये खूप लकी समजतो. त्यामुळे हिचा डान्स बघून मला वाटले की आपणही हिला बक्षीस दिले पाहिजे.”

धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, ते सध्या चित्रपटसृष्टीपासून खूप लांब गेलेत. आणि ते त्यांचा जास्त वेळ त्यांच्या फार्म हाऊसमध्ये घालवतात. ते लवकरच त्यांच्या होम प्रॉडक्शन चित्रपटात ‘अपने’च्या सिक्वलमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात सनी आणि बॉबी देओल सोबत त्यांचा नातू करण देओल हा देखील असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दोन कोटी रुपये की, ६ मुलींसोबत हॉलिडे?’, प्रियांकाच्या प्रश्नावर कपिलने दिले जबरदस्त प्रत्युत्तर, ऐकून तुम्हीही खदखदून हसाल

-‘बिग बॉस १४’ फेम निक्की तांबोळीच्या बाथरूममधील व्हिडिओने वेधले चाहत्यांचे लक्ष, ग्लॅमरस अंदाजावर चाहते फिदा

-मल्टीकलर स्विमसूटमध्ये बोल्ड अंदाजात दिसली प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट; पाठीवरील टॅटूने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

हे देखील वाचा