Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड लोणावळ्यात आहे १०० एकरचे फार्महाऊस, पाहा बॉलीवूड स्टार धर्मेंद्रच्या करोडो रुपयांच्या फार्महाऊसचे फोटो

लोणावळ्यात आहे १०० एकरचे फार्महाऊस, पाहा बॉलीवूड स्टार धर्मेंद्रच्या करोडो रुपयांच्या फार्महाऊसचे फोटो

बॉलीवूडमधील हीमॅन म्हणून प्रसिद्ध असणारे धर्मेंद्र यांनी वयाची ८६ गाठली आहे. या वयातही त्यांचा उत्साह हा तरुणांना लाजवणारा आहे. ब्लॅक अँड व्हाईट काळापासून ते आजपर्यंत धर्मेंद्र या कला क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने अनेक दशकं बॉलीवूडवर आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. धर्मेंद्र हे चित्रपटांइतकेच सोशल मीडियावर देखील भरपूर ऍक्टिव्ह असतात. धर्मेंद्र आता त्यांचा भरपूर वेळ हा त्यांच्या फार्म हाऊसवर व्यतीत करतात. त्यांचे या फार्म हाऊस वरचे अनेक व्हिडिओ, फोटो नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

धर्मेंद्र यांचे लोणावळ्याजवळ १०० एकरचे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसमध्ये धर्मेंद्र अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामे करत असतात. सेंद्रिय शेती, गाय म्हैस यांचे पालन सोबतच अनेक विविध पक्षी आणि प्राणी देखील आहेतच. धर्मेंद्र यांनी या फार्म हाऊसवर अनेक सुंदर कल्पना राबवल्या आहेत.

या फार्म हाऊसवर १००० फूट खोल तलाव, बगीचे, रॉक गार्डन, लहान मोठे धबधबे, दरी अशा अनेक निसर्गाशी जोडल्या जाणाऱ्या गोष्टी त्यांनी या फार्म हाऊसवर केल्या आहेत. संपूर्ण हिरवाईत नटलेल्या या फार्म हाऊसच्या सौंदर्यात आजूबाजूला असणारे डोंगर, दऱ्या अधिक भर घालतात.

त्यांच्या या सेंद्रिय शेतीमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, फळे, तांदूळ आदींचा समावेश आहे. धर्मेंद्र यांचा गायीचे दूध काढतानाच एक व्हिडिओ, मोरांना खायला देतानाचा व्हिडिओ आदी अनेक व्हिडिओ खूप व्हायरल झाले होते.

या सर्व व्हिडिओमधला धर्मेंद्र यांचा अंदाज पाहून खरंच त्यांच्या या उत्साहाचे गुपित नक्की काय आहे, असं प्रश्न विचारण्याचा मोह आवरत नाही.

वयाच्या ८६ व्या वर्षी देखील धर्मेंद्र त्यांच्या फिटनेसबाबतीत प्रचंड जागरूक असतात. ते त्यांच्या फार्म हाऊसवर नियमितपणे व्यायाम करतात. त्यांचा वर्कआऊट करतानाच एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता.

धर्मेंद्र यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते की, “मला नेहमीच निर्सगाच्या सानिध्यात राहायला आवडते. मी एक जाट आहे आणि जाट नेहमीच त्याच्या जमिनीशी जोडलेला असतो.”

हे देखील वाचा