अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक लवकरच धर्मवीर २ या सिनेमातून प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. आनंद दिघे यांच्या भूमिकेत प्रसादने अगदी सगळ्यांची माने जिंकली आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. यानिमित्ताने तो सतत मुलाखती देतोय. अशाच एका मुलाखतीत प्रसादने त्याच्या आजवरच्या करियर विषयी बोलले आहे.
आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलताना प्रसादने त्याच्या घर घेण्याविषयी सांगितले. प्रसादने मुलाखतीत त्याच्या घराबाबत बोलताना जुन्या दिवसांबाबत बोलले. पुण्यातून अभिनय करण्यासाठी मुंबईत आलेल्या प्रसादने त्याच्या लग्नाच्या २५व्या वाढदिवशी पत्नी मंजिरीला मुंबईत घर गिफ्ट केले. त्याचे घर अगदी या वर्षीच्या, म्हणजेच २०२४ च्या सुरुवातीला झाले
प्रसाद म्हणाला, १९९७ – ९८ साली मी मंजुला पुण्यातून मुंबईत आणले. दादरला आम्ही उतरलो. तेव्हा ती मला म्हणाली आपण अंधेरीला जायचं का ? तिला त्या भागाविषयी खूप आकर्षण होतं. कारण बरेच सेलीब्रिटी याच भागात राहतात. तेव्हा मी तील सांगितले होते की आपण बोरीवली ला जात आहोत. त्यानंतर मग आम्ही कांदिवली मध्ये राहिलो. अगदी २३ वर्षे. नेहमी विषय व्हायचा की आम्ही अंधेरीत घर कधी घेणार.मुलांची शिक्षणे सांभाळून आम्ही थोडू थोडी बचत करत होतो.मला तिचं स्वप्न मला पूर्ण करायचंच होतं. मग मी विचार केला की लग्नाला २५ वर्षे होत आहेत. आता घर नाही घेणार तर मग कधी घेणार
सुदैवाने तिला हवं तसं घर आम्हाला त्यावेळी मिळालं. मला असं वाटतं की या सगळ्यासाठी डॉ. लागू, निळूभाऊ, राजा गोसावी, आशिक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, दिघे साहेब या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. त्यांचीच हि पुण्याई आहे. लोकांना वाटतं की याला घर असंच मिळालं आहे. पण तसं नाहीये भयंकर खस्ता खाऊन रक्ताचं पाणी करून हे घर झालंय. कोणत्याही शासकीय कोट्यातून.नाही. लोकांना फार गैरसमज आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
माझ्या मुलांसाठी मी स्वतः जेवण बनवते; अनुष्काने सांगितली तिच्या कुटुंबाची दिनचर्या…