Friday, July 5, 2024

मोबाईलच्या दुकानाला सोनू सूदचं नाव, ‘१०० रुपयांचा रिचार्ज मिळेल का?’ म्हणत अभिनेत्याचा मजेशीर अंदाजात प्रतिसाद

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनदरम्यान लोकांसाठी एक देवदूत बनला होता. लॉकडाऊन दरम्यान सोनूने हजारो प्रवासी कामगारांना मदत केली आणि त्यांना त्यांच्या घरी पोहोचवले. त्याचबरोबर, लॉकडाऊन संपल्यानंतरही सोनू सतत लोकांना मदत करत आहे. कधी तो ऑटो चालकाच्या तुटलेल्या हाताचे ऑपरेशन करून देतो, तर कधी भाजी विकणाऱ्या अभियंता महिलेला कंपनीत काम मिळवून देतो. अभिनेत्याच्या या कामाने शेकडो लोकांची मने जिंकली आहेत. त्याचवेळी लोक यासाठी त्याला वेगवेगळ्या स्टाईलमध्ये आभार मानताना दिसत आहेत.

कोणी आपल्या मुलाचे नाव सोनू ठेवले, तर कोणी नवीन काम सुरू केले आणि काहींनी तर दुकानांना सोनूचे नाव देत अभिनेत्याचे आभार मानले. त्याचवेळी ध्रुव कुमार नावाच्या एका व्यक्तीने, त्याच्या मोबाइल दुरुस्ती व रिचार्जच्या दुकानाला सोनूचे नाव दिले आहे. त्याच्या या दुकानाचे नाव त्याने ‘सोनू सूद टेलिकॉम’ असे ठेवले आहे.

ध्रुव कुमारने दुकानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्यक्तीने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने दबंग अभिनेता सोनू सूदला टॅग देखील केले आहे. ध्रुवने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये, दुकानाच्या वर सोनूच्या नावाचे पोस्टर दिसत आहे. तसेच पोस्टरवर सोनूचा फोटोही आहे.

दुकानाचा फोटो शेअर करत त्या व्यक्तीने लिहिले आहे, “सोनू सूद मोबाइल शॉप, मोबाईल रिचार्ज आणि मोबाईल रिपेअरिंग, #सोनूसूद.” असे लिहून त्याने सोनू सूदला टॅगही केले आहे. आता अभिनेत्याने हे ट्वीट वाचले आणि त्या व्यक्तीला अतिशय मजेदार पद्धतीने प्रतिसाद दिला.

उत्तर देताना सोनू म्हणाला, “100 रुपयांचे रिचार्ज मिळेल का भाऊ?” असे म्हणत सोनूने हसणारा इमोजी देखील पोस्ट केला आहे. सोनू सूदची प्रत्युत्तर देण्याची स्टाईल नेटकऱ्यांनी खूप आवडली आहे. यामुळे सोनूचे हे ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे.

लॉकडाऊन दरम्यान, वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना घरी पोहोचवणाऱ्या सोनू सूदने, केवळ त्यांना घरी सोडले नाही, नाही तर त्यांना रोजगाराची सुविधा देखील उपलब्ध करून दिली. यासह तो वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. सोनूच्या या कामांसाठी त्याला संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमातर्फे ‘एडीजी स्पेशल मानवतावादी कृती पुरस्काराने’ गौरविण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सगळं ठीक तर आहे ना?’ म्हणत सुष्मिताच्या भावनिक पोस्टवर चाहत्यांची प्रतिक्रिया

-व्हिडिओ! ‘कुछ तो है’ मालिकेच्या सेटवरही दिसली होळीची मस्ती, अभिनेत्री कृष्णा मुखर्जीकडून मजेशीर व्हिडिओ शेअर

-खबरदारी महत्त्वाची! बीएमसीच्या कारवाईनंतर अभिनेत्री झाली सावध, स्वत: सोबत फोटोग्राफर्सचेही हात केले सॅनिटाईझ

हे देखील वाचा