आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंधर (dhurandhar)2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती. आदित्य धर दिग्दर्शीत ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट अनेक कलाकारांना आवडला आहे तरी यावर त्यांनी प्रतिक्रिया ही येत आहेत.
‘धुरंधर: द रिव्हेंज’ने बुधवार ते रविवार या आपल्या ओपनिंग वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली. पेड प्रिव्ह्यू, ईदच्या सुट्ट्यांचा पुरेपूर फायदा झाला आहे. या चित्रपटाने देशांतर्गत 454.12 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली आहे. जगभरात, या चित्रपटाने अंदाजे 691.32 कोटी रुपये कमावले आहेत. अधिकृत आकडेवारी जाहीर होईपर्यंत हा चित्रपट सहजपणे 700 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल असा तज्ञांचा विश्वास आहे.
‘धुरंधर: द रिव्हेंज या चित्रपटाने रविवारी, केवळ भारतातच 114.85 कोटींची कमाई करून आपली पकड आणखी मजबूत केली. भारतीय चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी चित्रपटांची यादी पाहिल्यास, ‘धुरंधर’च्या पहिल्या भागाने 1307.35 कोटींची कमाई केली होती. आता, त्याचा सिक्वेल, ‘धुरंधर: द रिव्हेंज’, केवळ त्याच्या आधीच्या चित्रपटाचा विक्रम मोडत आहे. तर ‘गदर 2’ ₹692.3 कोटी ‘दंगल’ (2070 कोटी), ‘पुष्पा 2’ (1742.10 कोटी) आश्यां या सारख्या अनेक उत्तम, चित्रपटांच्या पंक्तीत धुरंधर 2 सामील होण्यासाठीही सज्ज होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










