आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला होता. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती. आणि आता तर बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घासत आहे. ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट अवघ्या सहा दिवसांतच चित्रपटाची कमाई 600 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट अनेक कलाकारांना आवडला आहे.
‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 578 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘धुरंधर 2’ ने सहाव्या दिवशी 56.55 कोटी रुपये जमा केले आहेत. ‘धुरंधर 2’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर चौथ्या दिवशी 114 कोटी, पाचव्या दिवशी 65 कोटी आणि सहाव्या दिवशी 56.55 कोटींची कमाई केली. सिकॅनिलकच्या आकडेवारीनुसार, ‘धुरंधर 2’ चे कलेक्शन 578.49 कोटींवर पोहोचले आहे. हा चित्रपट लवकरच 1000 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल अशीही अपेक्षा आहे.
‘धुरंधर ‘ गेल्या वर्षी 5 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा लोकांना फारशा अपेक्षा नव्हत्या. पण जेव्हा लोकांनी तो पाहिला, तेव्हा त्यांना त्याची ताकद दिसली. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या ‘धुरंधर 2’ चित्रपटगृहांमध्ये सुरू असून यानेही फार कमी दिवसात प्रचंड यश मिळवले आहे. तर यानंतर तो ओटीटीवर पाहण्यासाठी उपलब्ध होईल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल हर्षिल कालियाचा भीषण अपघातामुळे मृत्यू










