Wednesday, March 18, 2026
Home बॉलीवूड दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी धुरंधर 2 बाबत दिला रिव्ह्यू, म्हणाले शोले पेक्षाही उत्तम

दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी धुरंधर 2 बाबत दिला रिव्ह्यू, म्हणाले शोले पेक्षाही उत्तम

रणवीर सिंग अभिनीत धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. तर याचा दुसरा भाग ही लवकरच प्रदर्शित होतात आहे. तर या चित्रपटाला रिलीज पूर्वेच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कारण ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई झाली आहे. तर याचे दिग्दर्शक आदित्य धर हे आहे. आदित्य यांनी उरी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. दोन्हीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम ठरले. धुरंदर प्रदर्शित झाल्यानंतर आदित्य धार यांचे अनेक लोकांनी कौतुक ही केले होते.

‘धुरंधर 2’ 19 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. ‘धुरंधर 2’ चे प्रिव्ह्यू शो आज म्हणजेच 18 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून सुरू होणार आहेत. प्रेक्षक चित्रपट पाहून त्यावर प्रतिक्रिया देण्यापूर्वीच, ‘धुरंधर 2’ चे रिव्ह्यू ट्रेंड्स येऊ लागले आहेत. ज्येष्ठ बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ‘धुरंधर 2’ पाहिला असून आपली प्रतिक्रियाही दिली आहे. राम गोपाल वर्मा यांनी ‘धुरंधर 2’ पाहिल्यानंतर एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘धुरंधर 2’ ला ‘शोले’ पेक्षा चांगला चित्रपट म्हटले आहे.

तर आता यामी गौतम  धुरंधर 2 मध्ये दिसणार अश्या चर्च्या होत्या. तसेच ‘धुरंधर’चे दिग्दर्शक आदित्य धर (dhar)यांची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले होते. सुमारे आठवडाभरापूर्वी, एका मुलाखतीदरम्यान यामीने सांगितले होते की, तिने ‘धुरंधर 2’ पाहिला असून तो तिला खूप आवडला आहे. तिने असेही म्हटले की प्रेक्षकांनाही हा चित्रपट नक्कीच आवडेल. ‘धुरंधर 2’ चे प्रिव्ह्यू शो आजपासून सुरू होतील.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

प्रतिक्षा संपली, आज उलगडणार धुरंदर 2च्या कथेतील सारे रहस्य

हे देखील वाचा