आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र हा चित्रपट 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती.
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट, रणवीर (Ranveer)सिंगने साकारलेल्या हमजा या पात्राची कथा पुढे नेतो. धुरंधर मधील ‘बडे साहेब’ कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक होते. तर आता सत्य समोर आले आहे. त्यांना पाहिल्यानंतर या पात्राभोवती असलेली सर्व चर्चा नाहीशी झाली. सर्वप्रथम, ‘बडे साहेब’ यांची भूमिका कोणी साकारली आहे आणि कथेमध्ये त्यांचे योगदान काय आहे, हे आपण जाणून घेऊया.
‘धुरंधर 2’ चित्रपटातील मुख्य खलनायक ‘बडे साहेब’ यांची ओळख म्हणजे चित्रपटातील ‘बडे साहेब’ हे पात्र अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर आधारित आहे, ज्याची भूमिका प्रतिभावान अभिनेता दानिश इक्बालने साकारली आहे. चित्रपटात त्याची स्क्रीन स्पेस मर्यादित आहे आणि त्याने प्रोस्थेटिक्सचा भरपूर वापर केला आहे. तो अंथरुणाला खिळलेला आणि खूप वृद्ध दिसतो. हे पात्र भारताविरुद्ध कट रचत आहे आणि अर्जुन रामपालने साकारलेल्या मेजर इक्बालद्वारे रणवीर सिंगची त्याच्याशी ओळख होते. दाऊद नावाचे हे पात्र किडनीच्या आजाराशी झुंज देताना, अनेक अवजड मशीन्स आणि ऑक्सिजन सपोर्टवर असल्याचे दिसते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अल्लू अर्जुनने केले रणवीर सिंग अभिनीत ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाचे कौतुक










