आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि आता ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र हा चित्रपट 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती.
धुरंधर 2 हा चित्रपट अनेक बॉक्स ऑफिस विक्रम मोडण्यासाठी सज्ज आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच, ‘बुकमायशो’ या ऑनलाइन तिकीट बुकिंग ॲपवर 14.81 लाख तिकिटे प्री-बुक झाली आहेत, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. या आधी हा विक्रम 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘जवान’च्या नावावर होता. मात्र 14.81 लाख तिकिटांच्या विक्रीसह, त्याने आता अव्वल स्थान पटकावले आहे. प्रदर्शनापूर्वी सर्वाधिक तिकीट विक्री झालेल्या चित्रपटांमध्ये, शाहरुख खान, नयनतारा आणि दीपिका पदुकोण अभिनीत ‘जवान’ हा चित्रपट एकूण 11.02 लाख तिकिटांच्या विक्रीसह अव्वल स्थानी होता. पण आता ‘धुरंधर’ने ‘जवान’ला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे.
धुरंधर (Dhurndhar)2 ने प्रंचड प्रमाणात ॲडव्हान्स बुकिंगमधुन कमाई केली आहे. तिकीट विक्रीवरून हे स्पष्ट होत आहे की चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी होणार आहे. पहिल्याच दिवशी 17000 हून अधिक शो झाल्यामुळे, हा चित्रपट पहिल्याच दिवशी दमदार कमाई करणार हे स्पष्ट आहे. चित्रपटाची मागणी अजूनही जोरदार आहे आणि केवळ ॲडव्हान्स बुकिंगमध्येच 14 लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
धुरंधर2; ‘धुरंधर 2’च्या क्लायमॅक्सने उडवले प्रेक्षकांचे होश, राकेश बेदींच्या भूमिकेची जोरदार चर्चा










