Monday, March 30, 2026
Home बॉलीवूड पुष्पा 2ला मागे टाकत धुरंधर 2ची दमदार आघाडी, आता हा चित्रपट घालतोय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

पुष्पा 2ला मागे टाकत धुरंधर 2ची दमदार आघाडी, आता हा चित्रपट घालतोय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट 18  मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती. आदित्य धर दिग्दर्शक हा चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना आवडला आहे तरी यावर त्यांनी प्रतिक्रिया ही दिले आहेत. 

रणवीर (ranveer)सिंग अभिनीत ‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकुळ घालत आहे. त्याने अवघ्या 11 दिघवसांत ‘पुष्पा 2’ चा कमाईचा विक्रम मोडला आहे. या चित्रपटात अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन, राकेश बेदी यांच्याही भूमिका आहेत. ‘धुरंधर 2’ ने प्रदर्शनाच्या अवघ्या दहा दिवसांत भारतात 780 कोटी रुपयांचा निव्वळ नफा आणि जागतिक स्तरावर तब्बल 1255 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

साॅकनिकच्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कमाई 1000 कोटी रुपयांच्या थोडी वर पोहोचली आहे. जागतिक स्तरावर, या हेरगिरीवर आधारित थ्रिलरने 1300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. याव्यतिरिक्त, आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’  ला मागे टाकले आहे, ज्याने भारतात 812 कोटी कमावले होते. ‘धुरंधर: द रिव्हेंज’ आता भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनण्याच्या मार्गावर आहे. ‘धुरंधर 2’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये सुरू असून चाहत्यांकडून त्याला प्रचंड प्रशंसा मिळत आहे. चित्रपटगृहांमधील प्रदर्शनानंतर, त्याच्या ओटीटी प्रदर्शनाची तयारी केली जाईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

 

अमीशा पटेलने जुन्या आठवणीना दिला उजाळा, सलमान खानसोबत बर्थडे सेलिब्रेशनचा खास फोटो केला शेअर

 

हे देखील वाचा