धुरंधर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धूम माजवली असून, त्याची कमाई 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार करून गेली आहे. आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही रिलीज झाला असून, प्रेक्षकांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील गाणी, व्यक्तिरेखा आणि कथानक यामुळे तो सतत चर्चेत राहिला. FA9LA सोबतचे जवळपास सर्वच गाणी प्रचंड व्हायरल झाली, मात्र त्यातील एक गाणं विशेष भावून गेलं.
चित्रपटातील ‘शरारत’ हे गाणं लहान शहरातील कठोर वास्तवात दडलेली एक गोड वेदना उलगडून दाखवतं. आयेशा खान आणि क्रिस्टेल डिसूजा जेव्हा या गाण्यात पडद्यावर दिसतात, तेव्हा प्रेक्षकांची मनाची धडधड वाढते. वरकरणी इच्छा आणि आकर्षण दाखवणारं हे गाणं प्रत्यक्षात त्याच्या संगीतकाराच्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे.
या गाण्याचं संगीत शाश्वत सचदेव (Shashwat Sachdeva)यांनी दिलं आहे. Galatta Plus ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या गाण्यामागची कथा उलगडली. शाश्वत म्हणतात, “शरारत आमच्यासाठी खूप खास आहे. मी एका थर्ड वर्ल्ड कंट्रीतील टियर-टू शहरात, लोअर मिडल क्लास कुटुंबात वाढलो. एखाद्या सुंदर मुलीला गर्लफ्रेंड बनवणं माझ्यासाठी स्वप्नासारखं होतं. ही श्रीमंत-गरीब अशी गोष्ट नाही, तर आपल्या संस्कृतीत ते शक्य नसतं. तरीही, एखादी सुंदर मुलगी माझ्यासाठी गाणं गावी किंवा मला रिझवावं, अशी इच्छा मनात होती.” ही गोड वेदना कायम मनात राहिली आणि त्यातूनच ‘शरारत’ या गाण्याचा जन्म झाला, असं त्यांनी सांगितलं.
आता धुरंधरचा प्रभाव हळूहळू ओसरत असताना प्रेक्षकांची नजर त्याच्या दुसऱ्या भागाकडे लागली आहे. 19 मार्च रोजी रिलीज होणाऱ्या धुरंधर 2 च्या टीझरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 1000 कोटींचा टप्पा पार करणाऱ्या या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये रणवीर सिंगच्या पात्राची मागील आयुष्याची कथा पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. नुकत्याच समोर आलेल्या शूटिंगदरम्यानच्या काही फोटोमुळेही चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यानंतरही धुरंधरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, हा चित्रपट सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
द 50: पहिल्याच दिवशी या युट्यूबरचा पत्ता कट, आता 49 स्पर्धकांमध्ये विजयासाठी रंगणार लढत










