Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी कोरोनाबाबत दिया मिर्झाचा महत्त्वाच्या सल्ला; म्हणाली…

गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी कोरोनाबाबत दिया मिर्झाचा महत्त्वाच्या सल्ला; म्हणाली…

आजकाल सोशल मीडियाचा वापर सगळेच करत असतात. आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असतात. यात सेलिब्रिटी तर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा ही नेहमी तिच्या आयुष्याशी निगडीत सर्व गोष्टींचा खुलासा सोशल मीडियावर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने ती गरोदर असल्याचे माहिती दिली होती. या काळात ती स्वतःची खूप काळजी घेत आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सांगितले आहे की, गरोदर महिलांनी या काळात कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे.

तुम्ही पाहू शकता की, दियाने गरोदर महिलांसाठी कोव्हिड प्रोटोकॉलवर चर्चा करत ट्वीट करून उत्तर दिले आहे. यामध्ये तिने सांगितले आहे की, गरोदर महिलांना आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना कोरोनाची लस घेतली नाही पाहिजे. तिने या ट्विटमध्ये सांगितले आहे की, तिला हा सल्ला तिच्या डॉक्टरांनी दिला आहे.

दियाने ट्विटरवर लिहिले आहे की, “एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. कृपया लक्ष द्या की, भारतात चालू असणाऱ्या कोरोना लसीचा अवलंब गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांवर केला जात नाहीये. माझ्या डॉक्टरांनी सांगितले आहे की, आपल्याला ही लस तोपर्यंत नाही घेतली पाहिजे जोपर्यंत मेडिकल परीक्षण गरोदर महिलांवर यशस्वी होत नाही.”

दियाने मागील काही दिवसात बेबी बंपसोबत एक फोटो शेअर करून माहिती दिली होती की, ती गरोदर आहे. तिच्या घरात लवकरच आनंद पसरणार आहे. याची तिने माहिती दिली होती. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तिने वैभव रेखी याच्यासोबत लग्न केले आहे. हे तिचे दुसरे लग्न आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अगं बाबोव! आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय गाण्यात उर्वशीने घातला होता ‘इतक्या’ कोटींचा ड्रेस; किंमत वाचून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

-चक्रीवादळामुळे अभिनेत्री दीपिका सिंगच्या घरापुढे पडले झाड, मग काय अभिनेत्रीने झाडासमोरच लावले जोरदार ठुमके; एकदा पाहाच

-‘हे रेकाॅर्डवरुन काढून टाका अध्यक्ष महोदय’, पाहा अभिनेत्री राजेश्वरी खरातने कुणाला केलीय विनंती

हे देखील वाचा