Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड अर्रर्र! तीन तास विमानात अडकली दिया मिर्झा, सामानही झाले गायब; वाचा संपूर्ण प्रकरण

अर्रर्र! तीन तास विमानात अडकली दिया मिर्झा, सामानही झाले गायब; वाचा संपूर्ण प्रकरण

अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी सतत जोडलेली असते. ती तिच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी आणि अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. अशातच आता दिया मिर्झाचे एक ट्वीट चर्चेत आले आहे, ज्यामध्ये तिने एअरलाइन कंपनीच्या निष्काळजीपणाचे कथन केले आहे. यात तिने सांगितले की, कशाप्रकारे तिला आणि बाकीच्या प्रवाशांना फ्लाइटदरम्यान त्रास झाला.

तीन तास विमानात पाहिली वाट
दिया मिर्झाने तिच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट केले आणि लिहिले, “दिल्लीसाठी UK904 जयपूर येथे लँडकडे वळवले. आम्हाला ३ तास विमानात थांबावे लागले. मग आम्हाला सांगण्यात आले की, फ्लाइट रद्द करण्यात आली आहे आणि आम्हाला उतरण्यास सांगितले जाते. विमानतळ प्राधिकरण किंवा विस्तारा यांच्याकडे कोणीही मदतीसाठी आले नाही आणि कोणाकडून प्रतिसादही मिळाला नाही. आमच्या बॅग्स कुठे आहेत?” असे म्हणत अभिनेत्रीने विमान कंपनीला टॅग केले आहे.(dia mirza tweeted about her bad experience of air travel)

दिया मिर्झाच्या या ट्वीटशिवाय इतर प्रवाशांनीही याबाबत ट्वीट केले आहे. याआधी ट्वीट करून एअरलाइन्सच्या बाजूने डायवर्जनची माहिती देण्यात आली होती. ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, “दिल्लीतील खराब हवामानामुळे फ्लाइट UK940 (BOM-DEL) जयपूर (JAI) च्या दिशेने वळवण्यात आली आहे. कृपया पुढील अपडेटसाठी संपर्कात रहा. तसेच, नंतर एअरलाइन टीमच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत, दिया मिर्झाच्या ट्वीटला रिप्लाय देण्यात आला आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर दिया मिर्झा लवकरच तिचा नवीन चित्रपट ‘धक धक’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याशिवाय फातिमा सना शेख (Fatima Sana Sheikh), संजना सांघी (Sanjana Sanghi) आणि रत्ना पाठक शाह (Ratna Pathak Shah) देखील दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात चार महिलांच्या संघर्षाची कथा दाखवण्यात येणार असून, २०२३ पर्यंत हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा