मागील काही दिवसांपासून सलमान खानच्या आगामी ‘टायगर ३’ या चित्रपटाबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट देखील पाहत आहेत. अलिकडेच, परदेशात शूट करत असलेल्या सलमान खानचे सेटवरील काही फोटो व्हायरल झाली आहेत. सध्या भाईजान कॅटरिना कैफसोबत रशियामध्ये शूटिंग करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इमरान हाश्मी या चित्रपटात पाकिस्तानच्या आयएसआय एजंट उर्फ ’टायगर ऑफ पाकिस्तान’ची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर आता इमरान हाश्मीने देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांच्या माहितीनुसार, इमरान हाश्मी सलमान खानसोबत काम करण्याच्या काही बातम्या येत होत्या. त्यावर स्वतः इमरान हाश्मीने पूर्णविराम देत, या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे. असे म्हटले जात होते की, ‘टायगर ३’चे शूटिंग सुरू झाले आहे. याबद्दल स्वतः इमरान हाश्मी म्हणाला की, “तुम्हाला कोणी सांगितले की मी यासाठी आधीच शूट केले आहे? लोक असे म्हणत आहेत, पण मी चित्रपटासाठी शूट केलेले नाही. खरं सांगायचं झालंच, तर मी चित्रपटाचा भागच नाही. लोक हे का म्हणत आहेत ते मला माहित नाही. मी कधीच याबद्दल अधिकृत माहिती दिली नाही किंवा असेही सांगितले नाही की मी हा चित्रपट करत आहे.”
काही दिवसांपूर्वी इमरान हाश्मीचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यात त्याचे आश्चर्यकारक परिवर्तन दिसत होते. यात तो आपले ऍब्स दाखवत होता. हा फोटो व्हायरल झाल्यापासून, चाहत्यांनी अंदाज लावला होता की, इमरानने ‘टायगर ३’ची तयारी सुरू केली आहे. याबाबत विचारले असता इमरान हाश्मी म्हणाला की, “त्या फोटोमध्ये मी जिममध्ये वर्कआउट करतोय. मी एका विशिष्ट पात्रासाठी शरीर तयार करत नाही. मला फक्त तंदुरुस्त राहायचे आहे.”
सध्या इमरान हाश्मी त्याचा ‘चेहरे’ या चित्रपट रिलीझ होण्याची वाट पाहत आहे. अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी व्यतिरिक्त रिया चक्रवर्ती, अन्नू कपूर, क्रिस्टल डिसूझा ‘चेहरे’ या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट २७ ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ
-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर
-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर