बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना चित्रपटाची स्क्रीप्ट आवडूनही ते त्या चित्रपटाला कमी फीसमुळे नकार देतात. याव्यतिरिक्त, अनेक कलाकार आहेत, जे स्क्रीप्ट आवडल्यानंतर कमी फीमध्येही काम करण्यास तयार असतात. काहीजण तर वैयक्तिक संबंधांमुळे फ्रीमध्येही काम करायला तयार होतात. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांच्या ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ या पुस्तकात अशाच एका कलाकारबद्दल सांगितले आहे.
राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांच्या ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ या आत्मचरित्रात सोनम कपूरच्या ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटाच्या फीबद्दल सांगितले आहे. दोघांनी ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे.
फक्त ११ रुपये घेतली होती फी
भाग मिल्खा भाग मध्ये सोनम कपूरची मुख्य भूमिका नव्हती. पण तिच्या कामाचे खूप कौतुक झाले. राकेश यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, सोनम कपूरने चित्रपटात बीरोचे पात्र साकारण्यास होकार दिला होता. यासाठी तिने केवळ ११ रुपये फी घेतली होती.
राकेश यांनी सांगितले आहे, जेव्हा सोनम पडद्यावर दिसायची तेव्हा तिची वेगळीच छाप सर्वाच्या मनावर पाडायची. सोनम कपूरच्या चित्रपटाशी संबंधित खास आठवणी आहेत. ती म्हणायची की, “मी चित्रपटाचा तडका आहे.” सध्याच्या नविन अभिनेत्री आजच्या काळात अशी पात्रे साकारत नाहीत.
जेव्हा बॉलिवूड हंगामाने राकेश ओमप्रकाश मेहरा यांना सोनमच्या फीबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले की, या चित्रपटात तिची विशेष उपस्थिती होती आणि तिने ११ रुपये घेण्याचे ठरवले होते. याचे कारण म्हणजे यापूर्वी ‘दिल्ली ६’मध्ये एकत्र काम केल्यामुळे त्या दोघांचा बॉन्ड चांगला होता. विशेष म्हणजे सोनमने केवळ ७ दिवसांत शूट पूर्ण केले होते. ज्यात ‘मेरा यार’ आणि ‘रंगरेझ’ या गाण्यांचा समावेश आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी
-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…