Friday, July 5, 2024

‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्री दिसणार ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही प्रसिद्ध मराठी मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत गेल्या काही दिवसात अनेक नवीन वळणं आली आहेत. आता या मालिकेत एका नव्या पात्राच्या प्रवेशाची चर्चा आहे. असे समजत आहे की, अभिनेत्री स्वानंदी टिकेकर या मालिकेत काम करताना दिसणार आहे.

पण तिचे पात्र नक्की काय असणार आहे, याची माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आता तिची या मालिकेतील भूमिका काय असणार आहे, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. स्वानंदीने ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधून मोठी प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतरही तिने काही मालिका आणि रिऍलिटी शोमध्ये काम केले.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा