‘मला जाणवलं की, पाठीमागून कोणीतरी ओढत आहे’, सुव्रत जोशीने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा!

dil dosti duniyadari fame marathi actor suvrat joshi told shocking insidence with during his shooting


मैत्रीवर आधारित असलेली ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मराठी मालिकेला रसिकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले होते. यातील मित्रपरिवार म्हणजेच सुज्या, रेश्मा, कैवल्य, अना, मीनल आणि आशुतोश यांना प्रेक्षकवर्गाने खूप प्रेम दिले. शिस्त आणि वागणूक याबद्दल खूप कडक असणारा, परंतु त्याच वेळी आपल्या सर्व मित्रांची काळजी घेणारा आणि गरजेच्या वेळी त्यांच्यासाठी उभा राहणारा असा सुज्या चाहत्यांचा आवडता आहे. सुज्या म्हणजेच अभिनेता सुव्रत जोशी होय. तो या मालिकेमुळे घराघरात पोहोचला.

अलीकडेच सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सखी गोखले या जोडप्याने एका यूट्यूब चॅनेलला भेट दिली होती. यावेळी सुव्रतने त्याच्यासोबत घडलेला, अंगावर काटा आणणारा, थरारक असा एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला होता. जाणून घेऊया काय होता तो किस्सा.

घडलेल्या घटणेबद्दल पुणे पॉडकास्ट या यूट्यूब चॅनेलशी बोलताना सुव्रत म्हणाला, “मी एका नाटकाच्या प्रयोगात होतो, तेव्हा माझा एक सीन प्रेक्षकांमध्ये होता. मग मी प्रेक्षकांमध्ये जाऊन एका खुर्चीवर बसलो. त्यावेळी त्या नाट्यगृहातल्या सर्व लाईट्स बंद होत्या. मी हातात एक बॅटरी घेतली आणि खुर्चीवर बसून माझा सीन करू लागलो. इतक्यात मला जाणवलं की, पाठीमागून मला कोणीतरी ओढत आहे. मला काही समजायच्या आतच मला पाठीमागून घट्ट पकडलं गेलं. मला दोन्ही हातांनी धरण्यात आलं आणि त्यानंतर जोराने माझे गालगुच्छे घ्यायला सुरुवात केली. मी अगदी भांबावून गेलो होतो. मला काहीच समजत नव्हतं की, माझ्यासोबत हे काय होतंय. त्यांनतर नाट्यगृहातील लाईट लावण्यात आल्या.”

पुढे तो म्हणाला, “हे पाहून नाट्यगृहातील सर्व लोक हसत होते. मी मात्र अजूनही शॉक मध्ये होतो. माझ्यासोबत असं काही झालं, याचा मला अजूनही विश्वास बसत नव्हता आणि महत्त्वाचं म्हणजे, त्या एक वयस्कर गृहिणी होत्या. मी त्यांना सहजपणे काकी म्हणू शकेन असं त्यांचं वय होतं. हा प्रसंग माझ्यासोबत घडल्यामुळे हे सर्व हसण्यावारी घेण्यात आलं. जर हा प्रसंग एखाद्या अभिनेत्री सोबत घडला असता, तर तिच्यावर अतिप्रसंग झाला, असं तुम्ही म्हटला असता. मात्र, अभिनेत्यांसोबत सुद्धा असे प्रसंग घडतात, तेव्हा आम्ही काय करायचं.” असे बोलून सुव्रत हसू लागला. विशेष म्हणजे, त्यानेही हा प्रसंग हसण्यावारीच घेतला.

‘दिल दोस्ती दुनियादारी’ मध्ये काम केल्यानंतर, सुव्रत ‘दिल दोस्ती दोबारा’ मध्ये दिसला. त्याने ‘शिकारी’, ‘पार्टी’, ‘डोक्याला शाॅट’, ‘अनन्या’, ‘फ्रेश सुसाईड’, ‘मन फकिरा’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय अभिनेता लवकरच ‘छूमंतर’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नवीन संगीतकार जोडी श्रोत्यांच्या भेटीला! ‘या’ फेसबुक पेजवरून गुरुवारी जाणार लाईव्ह, पाहा कसा सुरू झाला श्रेयसी अन् शौनक यांचा प्रवास

-‘काळ्या चिमण्या दिसंना झाल्यात, आवरा राव थोडंसं’, शालूचा डान्स पाहून चाहत्याची भन्नाट कमेंट

-पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खानसोबत लग्नबंधनात अडकणार होती रेखा, अभिनेत्रीची आई कुंडली घेऊन थेट पोहोचली होती ज्योतिषीकडे


Leave A Reply

Your email address will not be published.