‘तारक मेहता’ मधून जेठालाल म्हणून घराघरात ओळख मिळवलेले दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी अलीकडेच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. ही गोष्ट ऐकून चाहते खरंच थक्क झालेत!
‘तारक मेहता’ हा शो प्रेक्षकांना खूप आवडतो. पण केवळ शोच नाही,तर यातले कलाकारही लोकांच्या मनावर राज्य करतात! या मालिकेत ‘जेठालाल’ ची भूमिका दिलीप जोशी करत आहेत,आणि त्यांच्या या मजेदार कॅरेक्टरवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे! दिलीप जोशी नेहमी आपल्या कामाबद्दल मोकळेपणानं बोलतात,पण खासगी आयुष्य मात्र ते खूपच खास ठेवतात. अलीकडेच एका इंटरव्ह्यूत त्यांनी अशी धक्कादायक गोष्ट सांगितली की,जेव्हा त्यांचा साखरपुडा झाला, तेव्हा त्यांच्या बायकोचं वय फक्त 14 वर्षं होतं!
त्यांच्या पत्नीचं नाव आहे जयमाला जोशी. दिलीप जोशी म्हणाले की,त्यांचं लग्न अगदी “बालिका वधू” सारखं होतं. जेव्हा त्यांना विचारलं की,”तुमची लव्ह स्टोरी काय होती?” तेव्हा ते हसून म्हणाले,”आमच्यात काहीच रोमँस नव्हता!” दिलीप जोशी यांनी सांगितलं की,”मी 18 वर्षांचा होतो आणि माझी बायको 14 वर्षांची तेव्हा आमची अरेंज मॅरेज झाली. नंतर मी 22 वर्षांचा झालो, ती 18 वर्षांची आणि मग आमचं लग्न झालं”.
ते पुढे म्हणाले,”मी बॉईज स्कूलमध्ये शिकलो असल्यामुळे मला मुलींशी बोलायला खूप भीती वाटायची. पण जेव्हा मी अभिनय शिकायला सुरुवात केली,तेव्हा हळूहळू आत्मविश्वास आला आणि मग मुलींशी बोलणं सहज वाटायला लागलं”. दिलीप जोशी यांनी ‘तारक मेहता’ शोच्या आधीही बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांमध्ये लहान भूमिका केल्या होत्या. पण खरी ओळख आणि लोकांचं भरभरून प्रेम त्यांना ‘जेठालाल’ या भूमिकेमुळेच मिळालं!
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा