Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

हम आपके है कौनच्या शूटिंग दरम्यान सलमानसोबत रूम शेअर केलेल्या दिलीप जोशी यांनी सांगितले, “त्याने नखरे केले…”

तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतून जगभर प्रसिद्ध झालेले अभिनेते म्हणजे दिलीप जोशी. या मालिकेने त्यांना लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली असली, तरी ते या क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये लहान लहान भूमिका साकारल्या. नुकतीच त्यांनी एक मुलाखत दिली यावेळी त्यांनी हम आपके हैं कौन? सिनेमाच्या आठवणींना उजाळा देत. सलमान सोबत घालवलेला वेळाबद्दल आठवणी सांगितल्या.

दिलीप जोशी यांनी सांगितले की, “मी माधुरी दीक्षित यांचा खूपच मोठा चाहता आहे. चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी मी त्या लोकांचे मला बोलावणे याच्या आधीच मी तयार झालो होतो. ती माझ्यासाठी एक फॅन मुव्हमेंट होती. मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्यांनी क्रिकेटचा ड्रेस घातला होता. ती जिन्यावरून उतरली आणि माझ्यासमोरून गेली. खऱ्या आयुष्यात मी त्यांना बघणे खूपच खास वेळ होती ती.”

पुढे दिलीप जोशी म्हणाले, “मला त्या काळी सूरज बडजात्या यांनी खूपच पाठिंबा दिला. मला जेव्हा जेव्हा टीव्ही शो ची शूटिंग असायची तेव्हा निर्मात्यांनी खूपच समजून घेतले होते. तेव्हा मला माझ्या शोसाठी केवळ एकाच भागाचे शूटिंग करावे लागायचे. मी त्यांना सांगितले होते की, माझ्या चार तारखा बुक आहेत, ते देखील त्या सोडून मगच माझे वेळापत्रक बनवायचे. नेमकी तेव्हाच इंडस्ट्रीमध्ये संप झाला आणि पुन्हा एकदा नव्याने सर्वच कलाकारांचे वेळापत्रक बनवावे लागले. नव्याने शूटिंग सुरु झाली, मात्र माझ्या तारखा अटकून गेल्या. तेव्हा मी सूरज जी यांना भेटायला गेलो. ते शूटिंगमध्ये व्यस्त होते तरी देखील त्यांनी माझे बोलणे ऐकून घेतले आणि सहाय्यकाकडून तारखा मागवल्या आणि सर्व काही नीट वेळापत्रक बनवले. ”

सुरज बडजात्या यांनी नेहमीच सर्व कलाकारांना एक सारखी वागणूक दिली. सलमानसोबत रूम शेअर करण्यावर ते म्हणाले, “सिनेमाचे फिल्मिस्तानमध्ये शूटिंग सुरु होते. तेव्हा मी सलमानसोबत रूम शेअर केली होती. सलमानने देखील याबद्दल काहीच तक्रार केली नाही. तो खूपच पाठिंबा देणारा होता. कधीही माझ्यासमोर त्याने नखरे केले नाही. त्याच्यासोबत काम करताना मला कायम मजा आली.”

हे देखील वाचा