दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) याचे २९ मे रोजी निधन झाले. पंजाबमध्ये त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अलीकडेच, गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने (Diljeet Dosanjh) व्हँकुव्हरमधील आपला कॉन्सर्ट सिद्धू मुसेवालाला समर्पित केला आणि त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या कॉन्सर्टचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये दिलजीत त्याच्या गाण्यांमधून आणि भाषणातून मूसेवालाला संगीतमय आणि भावपूर्ण पद्धतीने श्रद्धांजली वाहताना दिसत आहे.
दिलजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कॉन्सर्टचे अनेक फोटो-व्हिडिओही शेअर केले आहेत, ज्यामध्ये चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. एक व्हिडिओ शेअर करत दिलजीतने लिहिले, ‘वन लव्ह’. शेअर केलेल्या फोटो-व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडमध्ये एक डिजिटल बॅनरही लावण्यात आलेला दिसतो, ज्यावर लिहिले आहे, ‘दिस शो इज डेडिकेटेड टू अवर ब्रदर्स’. दिलजीतने आपल्या कॉन्सर्टमध्ये सिद्धू मूसेवालाचे नाव घेताच टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला आणि लोक मोठ्याने मूसेवालाच्या नावाचा जयघोष करू लागले. (diljit dosanjh dedicates his vancouver concert tribute to singer sidhu moosewala)
मूसेवालाच्या आठवणीत एक खास गाणे गाणारा दिलजीतही व्हिडिओमध्ये दिसतो. याशिवाय दिलजीतने एका भावूक क्षणाबद्दलही सांगितले की, जेव्हा मूसेवालाच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या अंत्यसंस्कारात पगडी काढली होती. ‘मला तुमचा आणि तुमच्या पगडीबद्दल खूप आदर आहे’, असे तो म्हणाले. दिलजीत म्हणाला की, “सिद्धू मूसेवाला याने पंजाबी समुदायाला नेहमी एकत्र राहण्याचा सल्ला दिला, कारण असे अनेक लोक आहेत जे आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.” दिलजीतने पंजाबी आणि मूसेवालाच्या स्मृतीला लक्ष्य करणाऱ्यांनाही सावध केले. तो म्हणाला की, “मूसेवालाचे नाव हृदयावर लिहिलेले आहे आणि ते पुसण्यासाठी खूप वेळ लागेल.”
२९ मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात काही हल्लेखोरांनी सिद्धू मुसेवाला याची गोळ्या झाडून हत्या केली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा