Friday, July 5, 2024

दिलजीतने शेअर केला मुलासोबतचा मजेशीर व्हिडिओ, सेलेब्सनी विचारले ‘आई कुठे आहे?’

लोकप्रिय पंजाबी गायक दिलजित दोसांझ हा आपल्या सुपरहिट गाण्याने तर सगळ्यांचे मनोरंजन करतच असतो. पण त्यासोबत तो सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. त्याने सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो व्हिडिओ बघून तुम्ही लोटपोट होऊन जाल. दिलजीत या व्हिडिओमध्ये त्याच्या मुलासोबत खेळताना दिसत आहे. असं म्हणतात ना की, लहान मुलांसोबत खेळताना तुम्हाला देखील लहान व्हावं लागत. तसंच काहीसं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. दिलजीतच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.

पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या मुलासोबत दिसत आहे. बाप- लेक या व्हिडिओमध्ये मजेशीररीत्या लपून एकमेकांना बंदुकीने गोळी मारताना दिसत आहे.

यात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दिलजीतच्या मुलाने अगदी बरोबर निशाणा साधून त्याला गोळी मारली आणि त्यावर दिलजीत घायाळ होऊन खाली पडला.

या मजेशीर व्हिडिओमध्ये त्या दोघांचा अभिनय बघण्यासारखा आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शन लिहिले आहे की, “द गुड द डॅड अँड द सन.” सोबतच अशी नोट लिहिली आहे की, हा व्हिडिओ एका फ्रोफेशनल व्यक्तीने बनवला आहे. कृपया याला कोणी ट्राय करू नका.

त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या व्हिडिओला लाईक करून कमेंट केली आहे. ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलने कमेंट केली की, ‘आई कुठे आहे?’ याव्यतिरिक्त फातिमा सना शेखने कमेंट करत लिहिले, ‘हा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे.’ तसेच राणा रणबीरने लिहिले की, ‘तुम्ही दोघे खूपच कमाल परफॉर्मर आहात.’ या मजेशीर व्हिडिओला आतापर्यंत 4 लाखांपेक्षाही जास्त जणांनी पाहिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडच्या ‘खिलाडी’ने केले ‘असे’ ट्वीट की झाला भलताच ट्रोल, नेटकरी म्हणालेे ‘ईदलाही हेच म्हणणार?’

-प्रेम हे! ‘हॅप्पी किस डे’ म्हणत प्रिन्सने केला पत्नी युविकाला किस करतानाचा फोटो शेअर; वेधले चाहत्यांचे लक्ष

-इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा

हे देखील वाचा