Saturday, June 29, 2024

काय सांगता राव? मागील २५ वर्षांपासून ‘या’ थिएटरमध्ये दाखवला जातोय ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’

 

कोणताही चित्रपट जेव्हा प्रदर्शीत होतो, तेव्हा त्या चित्रपटाला पाहण्याची उत्सुकता ही काही कालावधीपर्यंत मर्यादित राहते. किमान, रिलीझ झाल्यानंतर तो चित्रपट एक दोन वेळा पाहिला जातो. त्यानंतर केव्हा तरी टिव्ही अथवा ऑनलाईन तो चित्रपट पाहण्याकडेच प्रेक्षकांचा कल राहतो. परंतू, एका चित्रपटाने या नियमाला छेद दिला आहे. आणि त्याला कारण आहे मुंबईतील एक थिएटर.

महाराष्ट्रात आणि मुख्यतः मुंबईत ‘मराठा मंदिर’ या थिएटरचं नाव खूपच लोकप्रिय आहे. त्याला लोकप्रिय करण्यामागे कारणही खास आहे.

तब्बत २५ वर्षांपूर्वी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा शाहरुख खान आणि काजोल यांचा सुपरहीट चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट तेव्हा तरूण-तरूणींपासून ते सर्वच वयोगटातील प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला होता. मात्र, मराठा रंगमंदिर या थिएटरचं या चित्रपटाशी अगदी वेगळंच नातं जुळून गेलं आहे.

संपूर्ण देशात फक्त हे एकमेव थिएटर असे आहे, जिथे गेल्या 25 वर्षांपासून ‘DDLJ’ हा चित्रपट लावला आहे. जेव्हा आपण बॉलिवूडच्या टॉप चित्रपटांबद्दल बोलतो, तेव्हा आजही ‘आदित्य चोप्रा’ यांचा सदाबहार चित्रपट ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ हा चित्रपट नक्कीच डोळ्यासमोर येतो.

शाहरुख खान आणि काजोल हे मुख्य भूमिकेत असणारा हा रोमँटिक चित्रपट 1995 साली प्रदर्शित झाला. आणि आजही हा 25 वर्षांपासून मुंबईच्या मराठा मंदिर थिएटर मध्ये दाखवला जात आहे. परंतू, मागील वर्षी कोविड-१९ च्या साथीमुळे हा विक्रम काही काळासाठी खंडीत झाला.

मात्र, मराठा मंदिर थिएटरमध्ये नोव्हेंबर 2020 पासून हा चित्रपट पुन्हा दाखवण्यास सुरवात केली आहे. महाराष्ट्र शासनाने थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांसाठी 50% बसण्याची क्षमता असणाऱ्या, थिएटरला पुन्हा उघडण्याची परवानगी दिली.

हे देखील वाचा